You are currently viewing मालेवाडा गडचिरोली : एक पाऊल पुढे

मालेवाडा गडचिरोली : एक पाऊल पुढे

*मालेवाडा गडचिरोली : एक पाऊल पुढे*

:- *प्रा. नरेशचंद्र काठोळे*

मागील आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील मालेवाडा पोलीस मदत केन्द्रा मधून फोन आला .पलीकडून पोलीस उपनिरीक्षक व मालेवाडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री नारायण राठोड हे बोलत होते .ते म्हणाले सर सोमवार दिनांक दहा जुलै रोजी आमच्या पोलीस पोलीस मदत केंन्द्रातर्फे आम्ही उभारलेल्या वीर भगवान बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आपणास प्रमुख पाहुणे म्हणून यायचे आहे. त्यांच्या फोनने माझ्या मनावर मोरपीस फिरविल्याचा भास मला झाला .मला आठवले यावर्षी शिवजयंतीला आदिवासी सरसेनापती श्री नंदूभाऊ नरोटे यांनी माझे गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 17 कार्यक्रम आयोजित केले होते .त्यातील एक कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यातील मालेवाडा या पोलीस मदत केंद्राच्या परिसरात होता. या कार्यक्रमाला माझ्याबरोबर पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक व प्रभारी अधिकारी श्री नारायण राठोड हे उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करून जेव्हा मला कळले की ते मालेवाडाला येथे ग्रंथालय व अभ्यासिका उभारीत आहेत. तर मला खूप आनंद झाला व माझा सहयोग म्हणून मी देखील पुस्तकांची मदत करण्याचे ठरविले. कार्यक्रम संपल्यानंतर श्री नारायण राठोड हे आठवणीने त्यांच्या पोलीस मदत केंद्रात घेऊन गेले .तिथे सविस्तर चर्चा झाली आणि तिथेच त्यांनी माझ्याकडून शब्द घेतला तो ग्रंथालयाच्या व अभ्यासिकेच्या उद्घाटनाला येण्याचा. मालेवाडा हा तसा दुर्गम भाग. पण सोमवार दिनांक 10 जुलै रोजी महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवीन पर्व प्रारंभ होत आहे .गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील मालेवाडा या पोलीस मदत केंद्राच्या मदतीने या संवेदनशील भागात या भागातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय व अभ्यासिका पोलीस मदत केंद्राच्या मदतीने प्रारंभ होत आहे. गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी श्री निलोत्पल त्या भागातील आमदार श्री कृष्णाजी गजबे तसेच आयपीएस अधिकारी श्री अनूप तारे श्री कुमार चिंता श्री यतिश देशमुख व उपविभागीय अधिकारी श्री साहील झरकर तसेच माझ्या प्रमुख उपस्थितीत या ग्रंथालयाचा व अभ्यासिकेचा प्रारंभ होत आहे .मालेवाडा या भागात आदिवासी विद्यार्थ्यांना हे ग्रंथालय व अभ्यासिका म्हणजे वरदान ठरणार आहे. खरं म्हणजे गडचिरोली हा जिल्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजधानी पासून खूप दूर आहे .तेवढाच उपेक्षित आहे आणि तेवढाच संवेदनशील पण आहे .नुसतं नागपूरला यायचं म्हणजे पाच तास सहा तास लागतात .मुंबईची तर गोष्टच सोडा. पण या भागातील विद्यार्थी प्रगती पथावर राहिले पाहिजेत. त्यासाठी अनेक अधिकारी नंदू भाऊ नरोटे सारखे सामाजिक कार्यकर्ते सातत्याने पुढाकार घेताना दिसतात. त्यामध्ये एका नवीन अधिकाऱ्याची भर पडली आहे. त्यांचे नाव आहे नारायण राठोड .ते मालेवाडा पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत .गडचिरोली म्हटले म्हणजे नक्षलग्रस्त भाग हे चित्र डोळ्यासमोर उभे होते .मी या भागात आतापर्यंत आयएएस अधिकारी श्री राहुल रेखावार व श्री उदय चौधरी तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री नंदू भाऊ नरोटे यांच्या सहकार्याने जवळपास 37 कार्यशाळा घेतल्या आहेत आणि आज मालेवाडा येथे या ग्रंथालयाच्या आणि अभ्यासिकेच्या उद्घाटनाला जाताना मनाला असे आतून वाटत आहे की अशाच अभ्यासिका जर गावागावात उभ्या झाल्या किमान जेथे पोलीस स्टेशन आहे तिथे उभ्या झाल्यात तर येणाऱ्या पिढीला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन मिळणार आहे .अशीच एक अभ्यासिका आमच्या अमरावती जिल्ह्यात अचलपूर पोलीस स्टेशनच्या परिसरात सुरू झालेली आहे. तत्कालीन ठाणेदार श्री सेवादास वानखडे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाची सुरुवात झाली. श्री नारायण राठोड यांनी घेतलेला पुढाकार हा निश्चितच अभिनंदन आहे .त्यांना मिळालेले जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या सहकार्य देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. एक अधिकारी चांगले काम करीत आहे तर त्याच्या पाठीशी संपूर्ण पोलीस विभागातील आयपीएस अधिकारी समर्थपणे उभे राहिले आहेत. साथी हात बढाना एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना. एक पोलीस अधिकारी काय चांगले करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री नारायण राठोड हे आहेत. तसा मालेवाडा हा संवेदनशील भाग आहे. पण या संवेदनशील भागातील विद्यार्थी नागपूरला मुंबईला पुण्याला जाऊ शकत नाही आणि नेमकी हीच बाब श्री नारायण राठोड यांनी हेरली आणि मुलांसाठी जर ग्रंथालय व अभ्यासिका उपलब्ध झाली तर विद्यार्थी अभ्यासिकेमध्ये येतील ग्रंथालयातील पुस्तके वाचतील आणि पुढे जातील या उदात्त हेतूने त्यांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे .खरं म्हणजे असाच खारीचा वाटा जर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी उचलला तर महाराष्ट्रातील विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिंमतीवर उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. मी जेव्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये फिरतो तेव्हा मला जाणवते ते दारिद्र्य. दूर दूर पर्यंत शहरी भागात आहे त्याप्रमाणे सोयी नाहीत. अभ्यासिका तर फार दूरची गोष्ट झाली ? शाळांमध्ये आश्रम शाळांमध्ये वस्तीगृहांमध्ये मी फिरलो आणि मग मुंबईच्या विद्यार्थ्यांची तुलना जेव्हा गडचिरोलीच्या मुलाशी होते तेव्हा नवल वाटते ? या भागातील विद्यार्थ्यांना खरं म्हणजे प्रत्येक प्रवेश परीक्षेला विशेष प्राधान्य दिले पाहिजे असेही वाटते. येथे फारशा सुविधा नाहीत. फारसे मार्गदर्शन नाही.पण इथला विद्यार्थी एकलव्यासारखा झुंज देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आणि त्या प्रयत्नाला अनेक मदतीचे आहात सामोरे येत आहेत .मा.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी नारायण राठोड सारख्या क्रियाशील अधिकाऱ्याला मदतीचा हात दिला .श्री अनुप तारे कुमार चिंता यतिश देशमुख साहिल झरकर यांनी देखील त्यांना प्रोत्साहन दिले .भारत निकाळजे आणि विजय कोळी हे तर श्री राठोड यांचे सहकारी. त्यांनी देखील या ग्रंथालय व अभ्यासिकेच्या कामात नारायण राठोड यांना मदत केली. आमदार लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य गावकरी हे सगळे एकवटले आणि एक चांगले ग्रंथालय व अभ्यासिका आज मालेवाडाला होत आहे आणि त्याची खरोखर गरजही आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी हा नागपूर तर सोडाच पण जिल्ह्याच्या ठिकाणी पण येऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचे कारण आहे आर्थिक दुसरे कारण आहे साक्षरतेचा अभाव तिसरे कारण आहे या भागातील नक्षलग्रस्तांचा प्रभाव .पण या सर्वावर मात करून मराठी पाऊल पडते पुढे या न्यायाने श्री नारायण राठोड यांनी पुढाकार घेतला आहे .विद्यार्थ्यांना जर योग्य पर्याय दिला योग्य वळण दिले योग्य संस्कार केले तर अशी ही मुले समाजामध्ये पुढेच जाऊ शकतात. काल-परवा मी वाशिम जिल्ह्यातील रिसोड या गावातील एका विद्यार्थ्यांचा प्रगतिशील व्हिडिओ पाहिला .त्याला 350 कोटीचे पॅकेज मिळणार आहे .एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने प्राप्त केलेले यश गरीब मुलगाही पुढे जाऊ शकते याचे प्रमाण आहे .तसेच यश गडचिरोली मधील मुलगाही प्राप्त करणार आहे. पण त्याला किमान गरज आहे ती ग्रंथालय व अभ्यासिकेची आणि त्याची सुरुवात सोमवार दिनांक 10 जुलैपासून मालेवाडा येथे होत आहे .खरं म्हणजे अशी ग्रंथालय ही खऱ्या अर्थाने देवालये आहेत. प्रत्येक गावात प्रत्येक पोलीस स्टेशनने जर पुढाकार घेतला तर अशी ग्रंथालय अभ्यासिका गावागावात तयार होऊ शकतात. आणि मला खात्री आहे हीच ग्रंथालये विद्यार्थ्यांना घडवू शकतात. आज ठीक ठिकाणी मोठमोठी मंदिरे उभारल्या जात आहेत. पण त्याचबरोबर गरज आहे ती ग्रंथालयाची अभ्यासिकेची. सर्वांनी हे काम मनापासून केले आणि ग्रंथालयांची निर्मिती केली तर येणाऱ्या महाराष्ट्राचे चित्र हे निश्चितच आधिक प्रभाशाली असेल. गडचिरोली सारख्या भागातील मालेवाडा गावातील या पोलीस मदत केंद्राच्या वतीने प्रारंभ होत असलेल्या अभ्यासिका व ग्रंथालयाला हृदयापासून शुभेच्छा.
*प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे*
संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती.9890967003

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − ten =