You are currently viewing वत्सल चांदणे

वत्सल चांदणे

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री  ज्योत्स्ना तानवडे यांची काव्यरचना*

 

कोजागिरी पौर्णिमेला

रायगडावरी जाते

दूध विक्री करूनिया

हिरा परत निघते ||

काम संपता उशीर

सूर्य अस्ताचला जाई

होता गडाचा नियम

महाद्वार बंद होई ||

तान्हे बाळ घरी असे

जाण्या अडचण येते

जिद्द धरोनीया मनी

हिरा धाडस पेलते  ||

नावाचीच हिरकणी

उतरली उभा कडा

मातृत्वाचा ओढीनेच

जिंकीयले रायगडा ||

कोजागिरीचा उत्सव

मातृत्व विजयी होई

हिरकणीचा बुरुज

गाणे वात्सल्याचे गाई ||

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × four =