नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले अभिनंदन
कणकवली
कणकवली नगरपंचायतच्या विषय समिती सभापतीपदासाठी आज बिनविरोध निवड करण्यात आली. यात बांधकाम सभापती पदासाठी ऍड. विराज भोसले, आरोग्य सभापतीपदी संजय कामतेकर, महिला बालकल्याण सभापतीपदी उर्वी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सभापती पदाची अधिकृत घोषणा प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केली. ऑनलाईन झालेल्या या विशेष सभेत पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी काम पाहिले. नूतन सभापतींचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी बांधकाम सभापती मेघा गांगण, माजी आरोग्य सभापती अभि मुसळे, माजी महिला बालकल्याण सभापती वृषाली सावंत, नगरसेवक बाबू गायकवाड, शिशिर परुळेकर, मेघा सावंत, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, अण्णा कोदे, सुशील पारकर, बंडू गांगण आदी उपस्थित होते.