You are currently viewing जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रा.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रा.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना

*स्वर गंधर्व*

🎻🎸🎼🎷🎺

नवे राग अन नवे तराणे
ओठवरती तुझेच गाणे

नाही स्वरांची कधी कमतरता
कधी नक्षत्रांचे अधीर देणे
स्वरांगना चे पिठुर चांदणे
ओठवर ती तुझेच गाणे

नको नको ते तुझे ते रूसणे
मांडू बंदिश पुन्हा नव्याने
सरगम उठती झंकारा ने
ओठवर ती तुझेच गाणे

मैफिली मधे तुझेच असणे
स्वर्ग सुंदरी चे असते देणे
स्वरांची ही कधी तरतमता
वादी संवादी तू लावून जाणे

अळवू नको ते स्वर भैरवी चे
तुझेच गीत अन माझे गाणे
उतरून यावा गन्धर्व इथे ही
तुझ्याच ओठी तुझे च गाणे

प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण
अंकली, बेळगाव

प्रतिक्रिया व्यक्त करा