वैभववाडी
वैभववाडी शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या शंकर मंदिरातील पिंडीवर नाग देवता प्रकट केली आहे. त्यामुळे आज दुपारपासून नागदेवतेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी गर्दी केली आहे. कोकिसरे गावच्या हद्दीत वैभववाडी – तळे मार्गावर हे छोटेखानी मंदिर आहे. या मंदिरात श्रावण सोमवारी भक्त दर्शनासाठी येत असतात. आज सोमवारी दुपारी या मंदिरातील एका पिंडीवर खरीखुरी नागदेवता प्रकटली आहे. नागदेवता पाहण्यासाठी व दर्शनासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
