You are currently viewing “फ्लॉवर फेस्टिवल” ह्या एका वर्षाच्या ऑनलाईन कोर्सचे दुसरे पर्व संपन्न..

“फ्लॉवर फेस्टिवल” ह्या एका वर्षाच्या ऑनलाईन कोर्सचे दुसरे पर्व संपन्न..

पुष्पसजावटीच्या विविध प्रकाराची मिळाली प्रात्यक्षिकाद्वारे माहिती

वेंगुर्ले :

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला, इंडियन वूमन सायंटिस्ट असोसिएशन, कोल्हापूर शाखा, गार्डन्स क्लब कोल्हापूर व रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “फ्लॉवर फेस्टिवल” ह्या एका वर्षाच्या ऑनलाईन कोर्सचे आज दुसरे पर्व संपन्न झाले.

यावेळी “फ्लोरल फेस्ट फॉर दसरा” या थीमवर आधारित पुष्परचनांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यामध्ये गार्डन्स क्लब कोल्हापूरच्या अध्यक्षा सौ. कल्पना सावंत यांनी “बिडरमायर” ह्या पुष्पसजावटीच्या नवीन प्रकाराची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. त्यानंतर डॉ. अल्पना चौगुले यांनी “फ्लोरल फ्लेस्टून” ह्या प्रकारातील अतिशय सुंदर अशी तोरणे करुन दाखविली. त्यानंतर कणकवली महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बाळकृष्ण गावडे ह्यांनी “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधता” ह्यावर मार्गदर्शन केले.

यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील वनस्पतींचा पुर्वेतीहास व वनस्पतींची चित्र रुपात ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ल्याच्या प्राध्या. डॉ. धनश्री पाटिल यांनी केले. तर आभार प्रदर्शन रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे उपाध्यक्ष रोट. प्रितीश लाड यांनी केले. रोट. नितीन कवठणकर व कुमा. करिष्मा मोहिते यांनी कार्यक्रमाच्या तांत्रिक बाबी सांभाळल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + three =