सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र विपुल परब यांनी बनविला रोजगाराचा अँप
महाराष्ट्र राज्यातील विविध पर्यटन स्थळांबरोबरच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या सविस्तर माहितीचा खजिना असलेले ‘चाकरमानी’ मोबाईल अँप हे भविष्यात महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनाचे मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी मुंबई येथे काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र विपुल परब याने हे अँप निर्माण केल्याने आपल्याला याचा सार्थ अभिमान आहे. चाकरमानी हा शब्द कोकणशी संबंधित आहे. मात्र आता ‘चाकरमानी’ ही महाराष्ट्राची ओळख बनणार आहे. समाजातील सर्व घटकांचा विचार करून या अँपची निर्मिती करण्यात आली हे कौतुकास्पद आहे. सर्वांनी हे अँप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावे असे आवाहन आमदार राणे यांनी केले.
अँपच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी राणे यांनी दिले. यावेळी अँपची सविस्तर माहिती विपुल परब यांनी दिली. जागतिक पर्यटनाच्या नकाशावर महाराष्ट्र राज्य आणण्यासाठी आपले विशेष प्रयत्न असल्याचे परब यांनी सांगितले. यावेळी सुरज कळंबटे, योगेश थेटे, सोहन अहिरे, साहिल परब, लीना नाईक,चेतना काजरोळकर, संकेत कांकरिया, इरफान चाऊस, अजिंक्य गांगुर्डे, गौरव निकम आदी उपस्थित होते.