You are currently viewing बांद्यात होणारा ‘गोवर्धन’ प्रकल्प ठरणार जिल्ह्यासाठी आदर्शवत – प्रजित नायर 

बांद्यात होणारा ‘गोवर्धन’ प्रकल्प ठरणार जिल्ह्यासाठी आदर्शवत – प्रजित नायर 

प्रकल्पामुळे भविष्यात बांदा कचरामुक्त होणार : बांदावासीयांना सहकार्य करण्याचे आवाहन

बांदा

बांदा ग्रामपंचायत प्रशासन शहरात राबवित असलेले विकासात्मक प्रकल्प हे कौतुकास्पद आहेत. कचऱ्यापासून खत निर्मिती करणारा सुमारे ५० लाख रुपये खर्चाचा ‘गोवर्धन’ प्रकल्प हा जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरेल. वेगाने विकसित होत असलेले बांदा शहर या प्रकल्पामुळे भविष्यात कचरामुक्त होणार आहे. या प्रकल्पासाठी बांदावासीयांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी येथे केले.

बांदा शहरासाठी मंजूर करण्यात आलेला गोवर्धन प्रकल्प याठिकाणी राबविण्यासाठी आज शासनाच्या तांत्रिक टीमने भेट देत प्राथमिक सर्वेक्षण केले. यावेळी नायर यांनी तांत्रिक टीमला व ग्रामपंचायत प्रशासनाला प्रकल्प राबविण्यासंदर्भात सूचना केल्यात.

यावेळी सभापती निकिता सावंत, उपसभापती शीतल राऊळ, पाणी व स्वच्छता मिशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, राजेश विरनोडकर, श्यामसुंदर मांजरेकर, किशोरी बांदेकर, रिया आलमेडा, समीक्षा सावंत, ग्रामविस्तार अधिकारी श्री. ठाकूर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 9 =