जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक, कवी प्रा. डॉ. जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना
मौन
अवचित सुटावे कोडे का ते
किती दिसांचे मौन होतें
नजरेमध्ये काही नसताना
अलगद धरती मोहरते
अबोल भाषा गूढ रम्य ही
मुक्यानेच का उलगडते
श्वास उसवला कप्प्यातुन ही
कोंदणात शब्द हारवते
विलग पाकळ्या होतानाही
मकरंद च मग ओझरते
कित्येक दिसांचे फिटले पारणे
पृथा अवचित थरथरते
चतुर्थी चा चन्द्र हसावा
होते ऋण ही नक्षत्रांचे
राजहंसच्या चोचीतुन ही
मोती टप टप निसटावे
जीवन गाणे असेच असते
दिल्या घेतल्या प्रेमाचे
सृजन कला ही निसर्ग निर्मीत
मानू आभार कसे देवतांचे
प्रो डॉ प्रवीण जोशी उर्फ जी आर जोशी
( राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारीत )
अंकली बेळगांव
कॉपी राईट