बांदा
मुस्लिमवाडी येथे राहणाऱ्या एका २६ वर्षीय युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दानिश शमसुद्दीन पिरजादे, असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर स्थानिकांनी त्याला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. उत्तम क्रिकेटपटू म्हणून परिसरात तो परिचित होता. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. दानिशच्या मृत्यूच्या बातमीने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.