You are currently viewing शाळा सुरु झाल्यामुळे सर्व प्राथमिक शिक्षकांना कोविड ड्युटीतून तात्काळ कार्यमुक्त करावे

शाळा सुरु झाल्यामुळे सर्व प्राथमिक शिक्षकांना कोविड ड्युटीतून तात्काळ कार्यमुक्त करावे

– राज्य संयुक्त चिटणीस म.ल देसाई यांची मागणी

सावंतवाडी

ऑक्टोबर २०२१ पासून ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्यामुळे तसेच प्राथमिक स्तरावरील मुलांचा पाया मजबूत करण्यासाठी व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी शासन निर्देशानुसार प्राथमिक शिक्षकांना सर्व प्रकारच्या कोविड ड्युटीतून वगळण्यात यावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीसश्री म.ल.देसाई यांनी आज सावंतवाडी दौ-यावर आलेल्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.मुस्ताक शेख यांचेकडे निवेदनाद्वारे केली.यावेळी झालेली चर्चा सकारात्मक चर्चा झाली.संघटनेची मागणी रास्त असून आपण याविषयी मा.जिल्हाधिकारी व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांचेकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + sixteen =