दुकाने बंद ठेवून सिंधुदुर्ग बंद मध्ये कणकवलीतील व्यापारी सहभागी
उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ कणकवली तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज पुकारलेल्या बंदला कणकवली शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला या निषेध मोर्चाला महाविकास आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून महामार्गावरून पटवर्धन चौक ते पुन्हा प्रांत कार्यालय पर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला.
शेतकरी हत्यारा मोदी सरकारचा निषेध असो, केंद्र सरकारचा निषेध असो, हमसे जो टकराएगा मिठ्ठी मे मिल जाएगा, महाविकास आघाडीचा विजय असो, शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, आ. वैभव नाईक आगे बढो हम तुम्हारे साथ है..!अशा घोषणांनी शहर परिसर दणाणून सोडला.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजू पावसकर, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, कॉंग्रेस सरचिटणीस महेंद्र सावंत , नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर,राजू राणे, शेखर राणे, सचिन सावंत, हर्षद गावडे,संदेश पटेल, अनिल हळदिवे, राजू राठोड, रुपेश आमडोसकर, रिमेश चव्हाण, निसार शेख, बंडू ठाकूर, भास्कर राणे, सचाभाई, संजय पारकर,सचिन आचरेकर, बाबुल शेख , महेश कोदे, अजित काणेकर, ललित घाडीगावकर, काँग्रेसचे प्रवीण वरुणकर प्रदीप जाधव, पंढरी पांगम ,संदीप कदम, मेहश तेली,नीलेश तेली, राष्ट्रवादीचे बाबू सावंत, दिलीप वर्णे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, प्रतीक्षा साटम यांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.