You are currently viewing शेतकऱ्यांच्या काँग्रेस प्रेमा बद्दल भाजपला टिका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही – इर्शाद शेख

शेतकऱ्यांच्या काँग्रेस प्रेमा बद्दल भाजपला टिका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही – इर्शाद शेख

शेतकऱ्यांच्या काँग्रेस प्रेमा बद्दल भाजपला टिका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. देशाच्या स्वातंत्र्या नंतर देशात कुळ कायदा लागू करून कसेल त्याची जमीन या न्यायाने देशातील गरीब शेतमजूरांना शेतजमीनीचे मालक बनविले त्या काँग्रेस पक्षाच्या शेतकरी प्रेमावर टिका करणे ही भाजपच्या नेत्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे.भाजप हा हिटलर शाही वृत्तीचा पक्ष असून केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचे कथीत कृत्य हे जनरल डायरच्या कृत्यासमान आहे. मात्र शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारणाऱ्या मंत्री पुत्राच्या कथीत कृत्याविषयी भाजपला कोणतीही लाज वाटत नसून देशाचे पंतप्रधानही असंवेनशील झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना देशोधडीस लावणाऱ्या भाजप पक्षाच्या कोणत्याही कार्याकर्त्यास काँग्रेस वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. उलट भाजपने केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घेवून त्यांच्या पुत्रास त्वरीत अटक करावी अशी मागणी सिंधुदूर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख यांनी केली आहे.
काँग्रेस कायमच देशाच्या जनते प्रति संवेदनशील असून भाजप सारखे बेगडी प्रेम दाखवत नाही.लखीमपुर खेरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वतः सुमोटो याचिका दाखल करून घेत भाजपाला आरसा दाखवला आहे.लखीमपुर खेरी येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकण्याचा आरोप केंद्रीय गृहराज्य मंत्री भाजपचे नेते अजय मिश्रा यांच्या मुलावर असून त्याच्यावर गून्हा नोंद केला आहे. मंत्रीपुत्राच्या कृत्याचे पुरावे देखील समोर आलेले आहेत असे असताना हे भाजपाई त्या मृत शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करायचे सोडून शेतकऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी, मृत शेतकऱ्यांच्या कुंटुबाचे अश्रु पुसण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांवर टिका करत आहेत. काँग्रेस कायमच दिनदुबळ्या गोरगरिब जनतेच्या सुख दुःखात सामील होऊन पिडितांचे अश्रू पसण्याचे काम करत आली आहे आणि हीच काँग्रेसची संस्कृती आहे आणि या पुढेही काँग्रेस पक्ष हे करीत राहील. इतर वेळी लहान लहान गोष्टीवरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त होणारे आपले तथाकथित संवेदनशील पंतप्रधान दिल्लीच्या सीमेवर गेल्या दहा महिन्यात आठशे शेतकरी मृत्यू पावले त्यावर ब्र काढायला तयार नाहीत. क्रिकेटपटू शिखर धवनच्या आंगठ्याला दुखापत झाली व तो वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकणार नाही म्हणून सोशल मिडीयाच्या माध्यमातून हळहळ व्यक्त करणारे आपले संवेदनशील पंतप्रधान लखीमपुर खेरी पासून 100 किलोमीटरवर उत्सव साजरा करण्यासाठी येतात परंतू त्यांना या पिडित कुंटुबाना भेटायला वेळ नाही किंवा त्या मृत शेतकऱ्यांविषयी सहवेदना सुद्धा व्यक्त करत नाहीत हे या देशाचे दुर्दैव आहे.भाजप मंत्री पुत्राला त्वरीत अटक न झाल्यास काँग्रेस जिल्ह्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात आंदोलनं करेल असेही इर्शाद शेख यांनी म्हटले केले आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा