करवीर निवासिनी
महालक्ष्मी अंबाबाई
जगदंबा रूप शोभे
तूज जगताची आई
साडेतीन पिठापैकी
एक पीठ तुझे माते
संकटात तू भक्तांच्या
हाकेसी धावोनी जाते
मूर्ती देखणी दगडी
मुकुट तो डोक्यावरी
दिसे त्यावरी शोभूनी
नागराज फणा धरी
रूप तुला रोज नवे
साडीची धार सोनेरी
किरणोत्सव असता
किरणे ती अंगावरी
भिंतीवरी देवळाच्या
नर्तकी यक्ष अप्सरा
टाळकरी विणावादी
कोरलेला हा पसारा
कृपा तुझी भक्तांवरी
ठेव सदैव तू आई
प्रार्थना हीच भक्ताची
अंबाबाई तुझ्या ठाई
©[दिपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६