You are currently viewing मंदिराचे दरवाजे उघडले.. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे बंदच..?

मंदिराचे दरवाजे उघडले.. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे बंदच..?

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारतीच्या बंद दरवाज्यांवरून मनसेची खोचक टीका

तर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र देखील तात्काळ सुरू करा..मनसेची मागणी

मागील अनेक महिन्यांपासून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारतीचा मुख्य प्रवेशद्वार वगळता बाकी इतर दरवाजे मागील अनेक महिन्यांपासून कोविड 19 प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आल्याने सर्व सामान्य जनतेसोबत कर्मचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पेन्शन सुविधेच्या कामासाठी येणारे माजी सैनिक व त्यांचे वृद्ध वारस लाभार्थी, वृद्ध शेतकरी, अशिक्षित कामगार वर्ग आदी कामांसाठी येणाऱ्या जनतेने नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.याशिवाय जिल्हा केंद्र स्थानी दाखले, शपथपत्र, हमीपत्र आदी विविध प्रशासकीय कामकाजासाठी येणाऱ्या जनतेची “सेतू सुविधा केंद्र” बंद असल्याने प्रचंड गैरसोय होत असून देखील जिल्हा प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे हे दुर्दैवी आहे.आजमितीस राज्यातील मंदिरांची दारं उघडली त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारतीचे दरवाजे देखील सर्व सामान्यांसाठी उघडले जातील का हा खरा प्रश्न आहे.जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन प्रशासकीय इमारतीचे अन्य दरवाजे सर्व सामान्यांसाठी खुले करावेत व सेतू सुविधा केंद्र चालू करावे अशी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा