You are currently viewing सिंधुदुर्गात जिल्हा बँकेसह आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीतर्फेच लढवणार – उदय सामंत

सिंधुदुर्गात जिल्हा बँकेसह आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीतर्फेच लढवणार – उदय सामंत

वेंगुर्लेत जिल्हा समन्वय समितीची बैठक संपन्न…

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसह जिल्ह्यात आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्वच निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लडवेल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समितीची बैठक आज वेंगुर्ले येथे फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाली.

या बैठकीबाबत माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तसेच अरुण दुधवडकर, संदेश पारकर, एम. के. गावडे, इर्शाद शेख, श्री. डॉन्टस, जान्हवी सावंत, प्रकाश जैतापकर, अतुल रावराणे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा