You are currently viewing प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना कोविड ड्युटीतून कार्यमुक्त करण्यात यावे

प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना कोविड ड्युटीतून कार्यमुक्त करण्यात यावे

डॉ. अनिषा दळवी शिक्षण आरोग्य सभापती याचे आश्वासन

दोडामार्ग

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ पदाधिकारी यांनी नुकतीच जि प सिंधुदुर्ग शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी, व माध्यमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक,यांची संयुक्त भेट शिक्षण सभापती यांच्या दालनात घेऊन जिल्ह्यातील महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. अनिषा दळवी यांनी जिल्हाधिकारी यांनी कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी (Covid-19) साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1997 व नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 अंतर्गत माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत.

सद्यस्थितीत माध्यमिक च्या सर्व शाळा (पाचवी ते बारावी) शासनाच्या आदेशाने सुरू झाल्याने माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व नैसर्गिक आपत्ती अधिनियम कायद्यातून कर्मचाऱ्यांना मुक्त करून त्यांच्या सेवा पूर्ववत कराव्यात अशी जोरदार मागणी माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने  माध्यमिक शिक्षणाधिकारी शेख व शिक्षण सभापती डॉ. सौ.अनिषा दळवी यांच्याकडे करण्यात आली.माध्यमिक अध्यापक संघाच्या मागणीला माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण व आरोग्य सभापती यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्याचे आश्वासन दिले.

या सभेमध्ये अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, सेक्रेटरी पांडुरंग काळे, टीडीएफ कोकण अध्यक्ष टी के पाटील, खजिनदार नंदकुमार नाईक,ज्येष्ठ नेते पंडित माने,श्यामसुंदर राणे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + twelve =