You are currently viewing जिल्ह्यात 10 ऑक्टोंबर पर्यंत गडगडाटसह पाऊसची शक्यता

जिल्ह्यात 10 ऑक्टोंबर पर्यंत गडगडाटसह पाऊसची शक्यता

हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी   

सिंधुदुर्गनगरी

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक  10 ऑक्टोंबर2021 पर्यंत गडकडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे वरील कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत करण्यात येत आहे.

या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.

*          संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत.

*          दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.

*          नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

*          घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

*          विजेच्या खांबांपासून लांब रहावे.

*          उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.

*          एखाद्या मोकळया परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.

*          धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष-02362-228847 किंवा टोल फ्री – 1077 ला संपर्क करावा, तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी – 02363-256518, सावंतवाडी तालुक्यासाठी – 02363-272028, वेंगुर्ला तालुक्यासाठी – 02366-262053, कुडाळ तालुक्यासाठी – 02362-222525, मालवाण तालुक्यासाठी – 02365-252045,कणकवली तालुक्यासाठी –  02367-232025, देवगड तालुक्यासाठी-  02364-262204, वैभवाडी तालुक्यासाठी – 02367-237239, या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा