बांदा
सावंतवाडी तालुक्यातील डेगवे-आंबेखणवाडीत श्री ब्राह्मणीस्थळ आहे. सदर ब्राह्मणीस्थळात स्थानिक ग्रामस्थ प्रतिवर्षी ब्राह्मण भोजन, श्री सत्यनारायणाची महापुजा, गौरीपूजन-विसर्जन, वटपौर्णिमा, श्रावण महिन्यात सात सोमवारचे व्रत करून ७ व्या सोमवारी ग्रामदेवता श्री माऊली पंचायतन देवतेच्या चरणीं अभिषेक करणे. ४८ खेड्यांच्या श्री स्थापेश्वर, महालक्ष्मी चरणीं अभिषेक करणे, तसेच स्थलाधिपती श्री ब्राह्मणी स्थळी अभिषेक करणे व ते तिर्थ एकत्र करून आंबेखणवाडीतील ग्रामस्थ व भाविक घेतात. व त्या नंतरच ग्रामस्थ उपवास सोडतात.व दुसऱ्या दिवसा पासून मांसाहार व मद्यपान करतात. हि या आंबेखणवाडीची प्रथा पूर्वजापासून सुरु असून सव्वाशे वर्षांपासून हि परंपरा सुरु आहे.
या मागे डेगवे, गावात सुख व शांतता लाभावी. गावात कोणत्याही प्रकारची रोगराई येऊ नये. हि ग्रामस्थांची भावना आहे.
अशा या स्थळात नवरात्र काळात विविध धार्मिक कार्यक्रम ग्रामस्थ साजरे करतात.रात्री ९.३० वाजता स्थानिक ग्रामस्थाचे भजन, आरती, महिलांचे विविध कार्यक्रम, रांगोळी, विद्युत रोषणाईने परीसर सुशोभित केला जातो. असे श्री ब्राह्मणीस्थळ देवस्थान समितीच्या वतीने डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस श्री उल्हास देसाई यांनी जाहिर केले असून भाविकांनी सहभागी व्हावे.अशी विनंती केली आहे.
उल्हास देसाई
सरचिटणीस, डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ, मुंबई.