You are currently viewing भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

सन 2020-21 करिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरील अनु.जातीइमावविजाभज व विशेष मागास प्रवर्गाचे नवीन अर्ज नोंदणी व अर्ज नुतनीकरण करण्यासाठी दिनांक 20 ऑक्टोंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रक्रीया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे  यांनी दिली.

         कोविड १९ विषाणू संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद असून ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम शिकवला जात असलयाने विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे अद्याप शिष्यवृत्ती अर्ज भरले नसलेल्या अनु. जाती. इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ अर्ज भरावित. जिल्हयातील सर्व महाविद्यांलयानी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहाय्यक आयुक्त , समाज कल्याण या कार्यालयाकडे वर्ग करण्याचे आवाहन  दीपक घाटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा