You are currently viewing मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी सन 2011-12 पासून Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमार्फत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात होता. ही ऑनलाईन प्रणाली सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून शासन स्तरावरुन बंद केली आहे. प्रणालीवरील सन 2011-12 ने 2016 -17 या कालावधीत तांत्रिक त्रुटी असल्यामुळे प्रलंबित असलेले अर्ज सन 2017-18 मधील Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमध्ये नुतनीकरण केलेले मात्र देयक न निघाल्यामुळे प्रलंबित असणारे अर्ज तसेच सन 2017-18 मधील प्रथम वर्षास असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज ज्या महाविद्यालयांनी सहाय्यक समाज कल्याण कार्यालयकडे अद्यापही सादर केलेले नाहीत . परंतु एखादा विद्यार्थी राहून गेलेला आहे. अशा महाविद्यालयांनी प्रस्ताव या कार्यालयास 7 ऑक्टोंबर 2021 पर्यत सादर करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण  विभागाचे अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

            जिल्ह्यातील महाविद्यालयांना कार्यालयाकडून वारंवार झालेल्या बैठकीव्दारे Google Meet या ऑनलाईन प्रणालीवरुन होणाऱ्या बैठकामध्ये, कार्यालयांकडून वारंवार केलेला प्रत्रव्यवहार याव्दारे अर्ज सादर करण्यातबाबत सूचना करण्यात आले आहे.

             सन 2011-2012 ते सन 2017-18 या कालावधीतील प्रलंबित प्रस्ताव  करण्यासाठी ही अखेरची मुदत देण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्रस्ताव विहीत वेळेत कार्यालयास सादर करावेत. प्रस्ताव सादर न केल्यास व या कालावधीतील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 5 =