जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्या विख्यात अभिनेत्री “बियोंड सेक्स” कादंबरीच्या लेखिका सोनल गोडबोले यांचा लेख.
सकाळी सकाळी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आले की प्रसन्न वाटतं ना.. वेगवेगळ्या रंगानी निसर्ग ती च्या साठी नटलाय.. उद्यापासून नवरात्र सुरु होतेय.. वेगवेगळ्या साड्यांनी सजत नटत आपण निसर्गाला आणि त्याच्या कलाकृतीला सलाम करणार आहोत आणि तो सलाम फक्त ९ दिवस नाही तर ३६५ दिवस.. अशा निसर्गाची अनेक रुपे स्री मधे दिसतात कधी मेड बनुन ती आपल्या घरी आपला भार हलका करते तर कधी तृतीय पंथीच्या रुपात शंकराच्या रुपात दिसते.. कधी आपल्या शरीराची विक्री करत तर कधी आई म्हणुन आपल्याला या सुंदर जगात घेउन येते.. कधी जवानाची कणखर बायको तर कधी पोलीस बनुन सेवा करते.. कधी नवऱ्यावर कटाक्ष तर कधी त्याचीच आई.. प्रेयसी मैत्रीण बनुन प्रसंगी दुर्गेचे रुप घेउन कुठल्याही संकटाला सामोरी जाते.. अशा असंखय रुपात स्त्री दुर्गा लक्ष्मी या रुपात वावरत असते.. कधी प्राण्याच्या रुपात तर कधी पक्ष्याच्या रुपात घिरट्या घालते.. अशा या स्त्रीचा सन्मान करुयात.. कुठलीही जात धर्म गरीब श्रीमंत भेद न मानता अशी एखादी स्त्री असेल जिला वर्षांतुन एक पण साडी विकत घेता येत नसेल तिला साडी देउन तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहुयात.. मी माझ्याकडील साडी देणार आहे आणि आनंद घेणार आहे..
पहा या आनंदात सहभागी हौवुन..
निर्जीव वस्तुत जीव अडकवण्यापेक्षा सजीवाला जीव लावुयात..
सोनल गोडबोले
लेखिका.. बियॉन्ड सेक्स कादंबरी