You are currently viewing संध्या छाया

संध्या छाया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी लेखक संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम कथा*

 

*’संध्या छाया’*

**************************

कसं असतं एखाद्या गरीबांच्या मुलाने काही विशेष कामगिरी केली की त्याचं कोणीच कौतुक करणार नाही पण कोणी श्रीमंताच्या मुलाने जर साधा फुगा जरी फोडला तरी त्याला डोक्यावर घेऊन मिरवतील,त्याचा सन्मान करतील,हारतुरे देऊन त्यांची गावभर मिरवणूक काढतील.शरदची मुलगी संध्या हिच्या बाबतीत असंच झालं,संध्या दहावीत शाळेत पहिली आली पण शिक्षक आणि आई वडिलांशीवाय कोणीही तिचं कौतुक केलं नाही.तिच्यामुळे गावाचा लौकिक वाढला पण गावातल्या कोणाकडूनही साधी कौतुकाची थाप मिळाली नाही. कारण शरदची परिस्थिती सर्वसाधारण होती तो मजुरी करायचा व शरद ची बायको लक्ष्मी लग्नकार्यात जेवणं वाढण्याचं काम करायची.खरतर परिस्थिती जेमतेम असतानाही आपल्या गरिबीचा विचार न करता. आईवडिलांचे कष्ट लक्षात घेऊन संध्या शिकली आणि दहावीला शाळेत पहिली आली तरी तिच्या कर्तृत्वाची गावकऱ्यांनी साधी दखलही घेतली नाही.पण गावातील सरपंचचा मुलगा जेमतेम काठावर पास झाला तर बापरे त्याला शुभेच्छा द्यायला घरात गर्दी महावत नव्हती.म्हणंजे गरीबांच्या लेकरूला काहीच किंमत नाही,कोणीच महत्त्व देत नाही असंच म्हणायच ना?शरद गरिब असला तरी प्रामाणिक होता सत्याने वागणारा होता खाऊन पिऊन सुखी आणि कोणाच्याही देण्यात घेण्यात नव्हता.आपल्या मुलीने खुप शिकावं मोठी अधिकारी व्हावं हेच स्वप्न घेऊन शरद उन्हातान्हात शेतात दिवसरात्र मेहनत करून मुलीला शिकवत होता.याच कष्टांची जाणीव ठेऊन संध्या बाराव्वीला शाळेतुनच नाही तर बोर्डातही पहिली आली.एका गरीबांच्या मुलीचे यश पाहून सारे गावकरी अचंबीत झालेत.कारण संध्या आईवडिलांना कामात मदत करूनही सतत आभ्यासही करत रहायची. आपल्या लेकीच यश पाहून शरद आणि लक्ष्मी आनंदाने भाराऊन गेलेत.ज्याला गरिबीची जाणिव असते ना त्याला कोणाच्या कौतुकाची गरज नसते.आणि आईवडिलांच्या कौतुका इतका सन्मान दुसरा कोणताच नसतो. म्हणून दुसऱ्याकडून कौतुकाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या यशावर विश्वास असला म्हणजे प्रगतीचा शिखर सहज पार करता येतो.तेव्हा संध्या बाराव्वी तर पास झाली पण पुढे शिकायचं म्हटल्यावर तिला घर सोडावं लागणार होतं.आणि बाहेरगावी जाऊन शिक्षण करणं तिला परवडणारं नव्हतं.म्हणजे खूप खर्च लागणार होता.गावात पुढच्या शिक्षणाची व्यवस्था नव्हती म्हणून बाहेरगावी जाण्याशिवाय पर्याय नव्हता.पण पैशांची अडचण असल्यामुळे संध्याला पुढच्या शिक्षणाचा विचार सोडून द्यावा लागला‌ केवळ परिस्थिती अभावी‌ संध्याने शिक्षण थांबवून शाळा सोडावी लागली संध्याच्या आईला खूप वाटायचं की संध्या ने खूप शिकावं नोकरी करावी पण गरिबीमुळे सांध्यांचे स्वप्न ते स्वप्नचं राहीले.

संध्याला शाळा सोडून जवळजवळ तिन ते चार वर्ष झालीत आता तिचं लग्नाचं वय झालं होतं शिवाय लोकांच्या तोंडाला काही झाकन नसतं.आणि जो बोलत नाही किंवा ज्याचं पाठबळी कोणी नसतं लोक त्यालाच जास्तच छळतात.तेव्हांच तर शेजारपाजारचे लक्ष्मीला संध्याच्या लग्नाबद्दल बोलायचे,किती दिवस मुलीला घरी ठेवणार!आता तिचं लग्नाचं वय झालंय,लवकर लग्न करून टाकं,दिनमान चांगले राहिले नाहीत नको त्या घटना घडतात आणि नको ते अयकाला मिळतंय.उगाच भलत सलतं काही घडलं म्हणजे?उगाच लोकांना काहीबाही बोलायला जागा नको.तेव्हा जस जमेल तसं संध्याचं लग्नं उरकवून जबाबदारीतून मुक्त होण्याचा सल्ला भावकीतले आणि गावातले काही जेष्ठ मंडळी शहाणपणाने शिकवत होते.कसं असतं ना लोकं उगाचचं दुसऱ्यांची चिंता करतात.ते स्वत:च्या घरातला अंधार बघणार नाही पण दुसऱ्यांच्या घारातला उजेड डोकावुन बघतिल.तसं पहायला गेले तर एक हिशोबाने भावकीतली माणसं जे काही सांगताय ते काही खोटं नव्हते.खरचं आता सांध्यांच्या लग्नाचा विचार करायला हवा.शरदच्या डोक्यात विचारांच चक्रं सुरू झाले.संध्यांच्या लग्ना बद्दल शरद आणि लक्ष्मीने पक्का विचार करून लगीनघाई सुरू केली. लक्ष्मीला मनोमनी खूप वाटायची की माझ्या संध्याला खूप शिकवायला पाहिजे होतं ती खूप शिकली असती तर कुठेतरी चांगल्या पदावर जाऊन नोकरी केली असती शिवाय तिला तिच्या मनासारखा नवराही मिळाला असता. पण सारं धुळीला मिळाले.मुलीच्या भविष्याचे स्वप्न घेऊन आईवडिल तिला वाढवतात शिकवतात आणि तिचं लग्नाचं वय झालं की परक्याचे धन म्हणून तिचं लग्न करून मोकळे होतात.खरतर मुलींच्याही काही ईच्छा असतात,स्वप्न असतात,पण काही कारणास्तव त्यांना सारेकाही सोडावं लागतं.आईवडिलांच्या प्रतिकुल परिस्थितीचा विचार करून संध्यानेही जास्त काही आढेवेढे न घेता लग्नासाठी होकार दिला.पण म्हणतात ना की भोगाचा झारा आटत नाही आणि फिटल्या शिवाय सुटत नाही. म्हणून ओळखीच्या संबधीत नात्यागोत्यातच संध्यांच लग्न आईवडिलांनी करून टाकले.चांगल चांगलं सांगुन संध्याचं लग्न तर केलं पण तिचं नशिबच फुटकं निघालं.जसे तिचे लग्न झाले तसे तिला एक दिवसही सुखाने जगता आले नाही. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या जाचाला ती खूपच वैतागली होती. आईविडीलांची परिस्थिती पाहून ती सारेकाही सहन करून तिला होणारा त्रास ती कोणालाच सागंतही नव्हती. जणुकाही आगीतून निघाली नी फफुट्यात पडली असंच झालं तिचं. त्रास तरी किती सहन करायचा तिने. लग्नाला दोन वर्ष होऊनही तिला मुलबाळ होत नव्हते म्हणून तिला बरंवाईट बोलुन छळायचे,मारझोड करायचे, मुलबाळ होण्यासाठी पुजापाठ उपवास,नवस करून संध्याने देवाला साकडे घातले पण देव काही तिला पावत नव्हता.ईकडे आईवडिलही संध्याला मुलबाळ होण्यासाठी देवदेव करत होते.मुलबाळ होत नाही म्हणून आजुबाजुचे लोकं सांध्यांच्या सासुला,व नवऱ्याला नाही नाही ते सल्ले देऊन त्यांच्या कानात तेल ओतायचे.आता अशावेळी शेजारपाजारचे माणसं आलतु फालतू सल्ले देऊन संबंधितांची दिशाभुल करायला नेहमीच पुढे असतात.पण एक लक्षात घ्या,ज्याचं कोणी नसतं त्याच्या पाठीशी देव असतो हे विसरून चालणार नाही.संध्या रोज नवऱ्याच्या हातून मार खायची,नवऱ्याकडून होणारा छळ काही न बोलता सहन करायची.वडिलांकडून पैसे घेऊन येण्यासाठी सतत संध्याचा नवरा तिच्याशी भांडायचा.एक दोन दा उधार उसनवारी करून शरदने पैसेही दिलेत.पण संध्याला होणारा त्रास काहीकरता कमी होत नव्हता.शेवटी मदत तरी कितीदा करायची.मदतीचे हात गुढग्यापर्यंतच असतात.त्यानंतर शरदने पैसे देण्याचे बंद केले.अशात देव पावला नी संध्याला दिवस गेलेत काही अंशी तिला होणारा त्रास कमी झाला.परमेश्वराने लक्ष्मी आणि संध्याची इच्छापूर्ती केली.आंनदाचे डोहाळे दोघी घरी लागलेत.दोन वर्षांनंतर घरात पाळणा हलणार होता याचा आनंद साजरा करण्याऐवजी घरासाठी वंशाचा दिवा हवा म्हणून जन्माला मुलगाच आला पाहिजे असा हट्टच सांध्यांच्या घरच्यांनी धरला.आता हे काय तिच्या हातात होत का बरं?पण त्रास देणाऱ्याजवळ काहीही बहाणे असतात.सासुने मुलाचाच आग्रह धरल्यामुळे सांध्यांला काही सुचत नव्हते.शेवटी तिने देवावर सोडले.पण काय कर्माचे भोग म्हणावेत.जे व्हायला नको होतं तेच झाले.संध्याला मुलगी झाली नी.तिच्या पायाखाली जमीन नसल्यासारखे तिला वाटू लागले.खरं पाहिले तर पहिली बेटी,सोन्याची पेटी असते असं म्हणतात.आणि जो भाग्यवान असतो त्यालाच पहिल्या कन्येचा बाप होण्याचं भाग्य मिळते पण याच महत्व ज्याला कळतं तो आपल्या या लेकीला फुलासारखं जपुन काळजाला लावतो.परतुं याच महत्व सांध्यांच्या सासु सासऱ्यांना नी् नवऱ्याला कळत नव्हते.खरं पाहता मुलांपेक्षा मुलींचं आपल्या आईवडिलांवर जास्त प्रेम असतं शिवाय शिक्षणात आणि प्रगतीच्या वाटेवरही चार पावले त्या पुढेच असतातं.सध्या तर प्रत्येक क्षेत्रात मुली स्वबळावर कार्यरत आहेत.तसेच मुलीचं कर्तृत्व आणि नेतृत्व मुलांपेक्षा वरचढच असतं.पण मुलगी का नको असते हे समजण्यापलीकडचे आहे.अरै वंशाच्या दिव्याला काय करायचं ते कुठे दिवे लावतात.म्हातरपणी आईवडिलांना मुलं वाऱ्यावर सोडून देतात तेव्हा हिच एक मुलगी जी आईवडिलांचा सांभाळत करते कधीच अंतर देत नाही मुलांपेक्षा मुलीला आईवडिलांची जास्त काळजी असते पण संध्यांच्या नवऱ्याला कोन समजावले शेवटी काय मुलगी झाली म्हणून संध्याला तिच्या नवऱ्याने सोडून दिले. सगेसोयरे,नातेवाईक,उरलेसुरले गावातील काही जेष्ठ मंडळींनी सांध्यांच्या नवऱ्याला तिच्या सासुसासऱ्यांना खूप समजावले पण ते समजण्यापलीकडेचे होते.शेवटी नाईलाजास्तव शरद आपल्या लेकीला आणि नातीला आपल्या घरी घेऊन आलेत.ईच्छा असतानाही संध्याला शिकवले नाही आणि ईच्छा नसतानाही तिचे लग्न करून टाकले आता चांगल्या मुलींच्या नशीबात अशी वाताहत यावी यांचा धक्का लक्ष्मी सहन करू शकली नाही.तेव्हा संध्याचा घटस्फोट झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत लक्ष्मीने या जगाचा निरोप घेतला नी शरद आणि संध्या पोरके झालेलं.लक्ष्मी फार मोठी जबाबदारी सोडून निघून गेली.शरदला तर काहीच सुचत नव्हते डोळ्यासमोर अंधारही अंधार दिसत होता.अस का व्हावं या प्रश्नाचे उत्तर काही करत सापडत नव्हते.पण जे झालं ते वाऱ्यावर सोडून चालणार नव्हते. उतारवयात शरदला आरामाची गरज असताना तिथे आता संध्या आणि तिच्या मुलीसाठी जास्त कष्ट करावे लागणार होते.खूप मेहनत घ्यावी लागणार होती.

संध्याला नवऱ्याने सोडून दिले म्हटल्यावर गावातल्या लोकांनी बोलायला तोंड उघडले.’हिच्यातच काहीतरी दोष असेल निट राहता आले नाही.हिनेच काहीतरी किडे पाडली असतील म्हणून नवऱ्याने सोडून दिले, ऐकून घेतले असते तर कुठे मरून जाणार होती पण नाही ना आली ती बापाच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला’. बापरे लोक काय नाही ते बोलायचे जखमेवर सहानुभूती ची फुंकर तर जाऊच द्या उलट जखमेवर मीठ चोळायला कितीतरी हात पुढे आलेत पण त्याची पर्वा न करता ‘बाप जिवंत असताना मी माझ्या मुलीला काहीच कमी पडू देणार नाही,जिवात जीव असेपर्यंत मी तिचा सांभाळ करेल’अस म्हणतं शरदने आपल्या लेकीला आणि नातीला ह्रुदयाला कवटाळून बोलणाऱ्याचे तोंडे बंद केलीत संध्याची पाठराखण करायला तिच्या पोटी छाया आली म्हणून संध्याने मुलीचं नाव छाया ठेवले.आणि खडतर कष्टाच्या वाटेवर लेकीला पाठीशी बांधुन जगण्यासाठी संघर्षाला सुरुवात केली.कारण संध्याला आपल्या लेकीसाठी जगावं लागणार होत कष्ट करावे लागणार होते.पण इथेही कर्माचे भोग संपले नाहीत.ज्या स्त्रीला नवऱ्याने सोडून दिलेलं असतं त्या स्त्रीला नाही नाही ते सहा करावं लागतं.गावातल्या तरण्याताठ्यांच्या नजरा संध्याकडे वाईट हेतूने वळत होते पावलो पावली तिला अपमान सहन करावा लागत होता.टोमणी टिपणी ऐकावी लागत होती अशी घान गावात नको म्हणून गावकरी संध्याला गावाबाहेर राहण्यासाठी सांगत होते.पण संध्यांच्या गुन्हा तरी काय होता ?तिला नवऱ्याने टाकून घातली एव्हढच ना!अरे अशा वेळी समाजाने नातेवाईकांनी तिच्या पाठीशी उभं रहायला हवं होतं तिला सहकार्य करायला हवं होतं पण नाही,या जागी एखाद्या श्रीमंतांची मुलगी असती तर तिला पाठीशी घातले असते तिला सहानुभूती द्यायला सारं गाव जमलं असतं पण शरद गरीब होता त्याला कोणाची साथ नव्हती म्हणून आजुबाजुचे सारे आचकट पाचकट बोलू लागलेत पण न घाबरता

अशा परिस्थितीत संध्या बोलणाऱ्याच्या विरोधात जुमानत नव्हती.अरे कोणताही बाप स्वतःच्या मुलीला वाळीत टाकणार नाही किंवा वाऱ्यावर सोडणार नाही.म्हणून कोणाचंही न ऐकता कोणाच्याही विरोधाला न जुमानता शरदने आपल्या मुलीलानी् नातीला स्वतःपासून दुर केले नाही.गावातच आणि स्वतःजवळ ठेऊन विरोधकांना हाकलून लावले. कस असतं डोक्यावरून पाणी गेल्यावर माणसाचा सय्यम सुटतो. आणि सहनशीलता संपली की माणसाला मर्यादा ओलांडावी लागतेच‌. सध्यांचिही सहनशीलता संपली होती. तिने ही कंबरेला पदर खोचलानी् गावकऱ्यांना तंबीच दिली,उगाच मला त्रास द्यायचा नाही.मी माझ्या वडिलांना या गावाला सोडून कुठेही जाणार नाही याच गावात राहून मी माझं आयुष्य जगेनं जर कोणी आम्हाला त्रास दिला तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. संध्याच रूद्रआवतार पाहून गावकरी आल्यापावली परत गेले.तरीही छाया सहा वर्षांची होईपर्यंत संध्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गावातल्या काहीं लोकांचा त्रास सहन करावा लागत होत.

लक्ष्मीने जे स्वप्न पाहिले होते तेच स्वप्न संध्याने छायाच्या बाबतीत पाहिले.मला नाही शिकता आले,नाही स्वतःच्या पायावर उभे रहाता आले, पण काहीही झालं तरी मी माझ्या लेकीला छायाला खूप शिकवीन मोठा अधिकारी करेलं त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करावे लागले तरी चाललेलं पण मी मागे हटणार नाही.आणि ज्यांनी ज्यांनी मला हिनवले,माझा अपमान केला,त्यांच्याच हातून नाही माझ्या छायाचा सत्कार केरून घेतला तर नावाची संध्या नाही मी.माझी मुलगी अधिकारी झाल्यावर एक दिवस हेच गावकरी म्हणातील,बघा ती सांध्यांची छाया किती मोठी अधिकारी झाली अस सांगुन संध्याने पदराला गाठ बांधून कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता ती आपलं काम करत रहायची. सध्यांच या धाडसाने शरदलाही बळ मिळाले आणि शरदही पुर्ण ताकदीने सांध्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला.छायाला शिकवून मोठी अधिकारी करायचं हेच एक स्वप्न उराशी बाळगून संध्याने स्वतःला कामात झोकून दिले. शरद सोबत तिही शेतात काम करायची बैलांच्या जागी स्वतःऔत खांद्यावर घेऊन शेत नांगरायची,अशात तिच्या पायात काटे टोचायचे धस शिरायची पाय मुरगळायचे पण त्याची पर्वा न करता फक्त छायासाठी संध्या घाम गाळत असे.काय करणार ज्याची पडती बाजू असते त्याला कोणाचीही साथ नसते कोणी काहीही बोलून घेतं.आणि आशा वेळी हतबल झालेल्या माणसाला सारेकाही एकून घ्यावं लागतं.बिचारी संध्या लोकांचे टोमणे ऐकून खूप रडायची आणि काम करत रहायची. कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल एकवेळ उपाशी राहु पण माझ्या लेकीला खूप शिकवीनच आणि खरच संध्याने छायाच्या शिक्षणासाठी काहीच कमी पडू दिले नाही.आहोरात्र कष्ट करून छायाला शिक्षणासाठी भक्कम पाठबळ दिले.छाया स्वकर्तृत्वावर मोठी होण्यासाठी संध्या छायाची सावली होऊन तिच्या पाठीशी होती.

छाया सुध्दा संध्या सारखीचं हुशार होती दहावी बारावीला ती जिल्ह्यात पहिली आली एमएस्सीत केमिस्ट्रीत विषयात तीने सुवर्ण पदक मिळवल्या नंतर विद्यापीठात तिचा भव्य सत्कार झाली नी गावकऱ्यांचे डोळेच फाटले. संध्याला बरंवाईट बोलणाऱ्याचे तोंड आपोआप शिवली गेलीत छाया गावातली आदर्श व्यक्ती म्हणून ओळखली जाऊ लागली शिवाय प्रतिकुल परिस्थितीवर मात करून जिद्दीला पेटलेला माणूस काही करु शकतो हे छायाने सिध्द करून दाखवले.जेव्हा शाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमात कलेक्टर होण्याचं तिने बोलून दाखवले तेव्हा काही टवाळखोर काही बायाबापुडे म्हणायचे ही काय कलेक्टर होईल.ईथे तिच्या बापाचा ठिकाणा नाही‌.घरात खायला दाणे ने आणि म्हणे कलेक्टर होईल असे भांडे घासायला ही कोणी ठेवणार नाही.पण मनाला झालेल्या जखमा आणि प्रयत्ना़ची ऊर्जा माणसाला स्वस्थ बसू देत नाही.जसजसे छायाला गावातली टवाळखोर कलेक्टर म्हणून चिडवायचे जेव्हा छायात ज्वाला पेटायची.कारण ती तिच्या आईचे अर्थात सांध्यांचे कष्ट रोज बघायची. लोकांची टोमणे टामणे रोज ऐकायची संध्या कोपऱ्यात जाऊन अश्रू पुसून घ्यायची पण छायाच्या डोळ्यात कधी पाणी येवू देत नव्हती. स्वतःजखमा घ्यायची पण छायाला तिच्या वेदनांची झळ पोहोचू देत नव्हती.छायाला आपल्या आईच्या कष्टाची जाणीव होती म्हणून ती रात्रंदिवस स्पर्धा परीक्षेचा मेहनतीने अभ्यास करत होती.कारण तिला कलेक्टरच व्हायचं होतं.संध्याने ठरवलंच होतं प्रयत्न कितीही करावे लागले तरी चालले पण आईला आणि आजोबांना लाल दिव्याच्या गाडीतून फिरवल्याशिवाय राहणार नाही बरंवाईट बोलणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून या पडक्या घराचा बंगला केल्याशिवाय आईच्या कष्टांची चीज होणार नाही.आणि खरचं प्रयत्नवादी माणसांच्या पाठीशी देवच उभा असतो. जो कष्ट करतो देव त्याला मदत करतो.म्हणून छाया कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता फक्त आपला अभ्यास करत रहायचं बस.मग कायं एक दिवस खरच संध्या आणि छायाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आलेत उज्वल भविष्याच्या सुवर्ण किरणांनी घरात प्रवेश केला.गावातल्या चौका चौकात गर्दी जमली होती प्रत्येकाचा हातात वर्तमानपत्र होते.साऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते काहींना तर विश्वास बसत नव्हता,तर काहींचे तोंड काळी पडलीत,काहीना त्यांच्या चुकीची लाज वाटायला लागली. काहींनी शरमेने माना खाली घातल्यात.छायाचा सत्कार करायला सांध्यांच्या घरी जाण्यासाठी गावातल्या लोकांची पावले पुढे पडतं नव्हती कारण छाया एमपीएससी परीक्षेत जिल्ह्यात पहिल्या आणि महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी झाली होती. कलेक्टर होऊन तिने खरचं गावाचं नाव रोशन केले होते.जिद्द मेहनत परिश्रमाने संध्याच्या स्वप्नांनी तिच्या पायांना स्पर्श केला होता.खरच संध्याला बरंवाईट बोलणारे गावाबाहेर हाकलून लावणारे त्याच माणसांनी छायाची गावात भव्यदिव्य मिरवणूक काढीली तिचे जंगी स्वागत केले.आणि लाला दिव्याच्या गाडीतून छायाचा गावात प्रवेश झाला तेव्हा खऱ्यार्थाने संध्याच्या कष्टांच सोनं झालं होतं छायाचा रूबाब पाहून दोघी मायलेकी एकमेकांना बिलगून खूप रडल्यात तर शरदची गळाभेट घेऊन दोघंही गहिवरून गेलीत.एखाद्याची परिस्थीती कशीही असली तरी त्याची टिंगल करू नये, कुणाचीही चेष्टा किंवा बरंवाईट बोलू नये.कारण दिवस बदलायला वेळ लागत नाही.प्रत्येक दिवस सारखा नसतो आणि प्रत्येक दिवस आपलाही नसतो.दिवस पलटतात आणि नशीब एक नव रूप घेऊन एखाद्याच आयुष्य बदलवतो‌ जसेकी संध्या छायाचे दिवस बदललेत.छायाने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता ती तिचं काम करत राहीली आणि एक दिवस खरच कलेक्टर झाली‌ छायाने आपल्या आईची स्वप्नपूर्ती करुन तिने आई व आजोबांना लाल दिव्याच्या गाडीतून फिरवले आणि ज्या जागेवर छोटं घर होतं तेथे मोठ्ठा बंगला बांधला आणि त्या बंगल्याला नाव दिले *संध्या छाया*.

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसूमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा