You are currently viewing देवगड बसस्थानकावर निर्भया तक्रार पेटी

देवगड बसस्थानकावर निर्भया तक्रार पेटी

सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार घाटे यांच्या हस्ते शुभारंभ

देवगड

देवगड पोलीस स्थानकाच्या वतीने ‘निर्भया ‘या महिलाकरीता राबविण्यात उपक्रमा अंतर्गत निर्भया तक्रार पेटी देवगड बसस्थानकावर बसविण्यात आली असून या उपक्रमाचा तक्रार पेटी फित कापून शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार घाटे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर ,सहा. पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण महिला पोलीस नाईक वनिता पडवळ,पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परब,निलेश पाटील ,दिवाकर परब शरद शिंदे तसेच वहातुक नियंत्रक ,महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होत्या. या वेळी पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी उपस्थित विद्यार्थी तरुणी याना महिला,मुलींची छेडछाड ,अथवा संबंधीत तक्रारी या निर्भया तक्रार पेटीत लेखी स्वरूपात टाकाव्यात यावर योग्य ती कार्यवाही करून तरुणी ना न्याय देण्यात येईल असे सांगितले.अशा तक्रार पेट्या देवगड महाविद्यालय शिरगाव वाडा मिठबाव याठिकाणी बसविण्यात आल्या असल्याची माहिती श्री बगळे यांनी दिली .

प्रतिक्रिया व्यक्त करा