दोडामार्ग :
गेली तीन वर्षे घोटगे व परमे या गावात जाणारी एसटी सेवा बंद आहे. मध्यंतरी कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व ठिकाणचे एसटी सेवा बंद होत्या. सध्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी तिराळी नदी पात्र असल्यामुळे सुमारे ३ ते ४ किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी व गावातील लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
सदर गावातील लोकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन तात्काळ दोडामार्ग ते घोटगे-परमे एसटी पूर्ववत सुरू करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी दोडामार्ग तालुकाध्यक्ष उद्योग व्यापार विभाग प्रविण विष्णु दळवी यांनी सावंतवाडी आगार प्रमुख यांना केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक न्याय विभाग दिपक जाधव, पुंडलिक दळवी, जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग इफ्तियाज राजगुरू आदी पदाधिकारी उपस्थित होते.