You are currently viewing कणकवलीतील श्रीधर नाईक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – नितेश राणे

कणकवलीतील श्रीधर नाईक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – नितेश राणे

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे मागणी…

कणकवली

येथील कै. श्रीधर नाईक चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे केली आहे. दरम्यान याबाबत निधीची उपलब्धता नसल्यास माझ्या स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत तरतूद करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन श्री.राणे यांनी प्रसिद्धीस दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, २७ ऑगस्टला केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेच्यावेळी राजकीय विरोधकांकडून नरडवे फाटा कणकवली येथील कै . श्रीधर नाईक यांच्या पुतळ्याजवळ अनुचित प्रकार घडवून कणकवली व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता , असे मला समजते. त्यामुळे आपल्या खात्यामार्फत कै. श्रीधर नाईक पुतळ्या जवळच्या परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लवकरात लवकर लावण्यात यावेत. याबाबत निधीची उपलब्धता नसल्यास माझ्या स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत तरतूद करण्यात येईल अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 17 =