जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास सदस्य दीपक पटेकर यांची काव्यरचना
पुन्हा एकदा अंगणात
किलबिलाट सुरू झाला
पाठ शिवणीचा खेळ
डोळ्यात भरू लागला
बंधनाचे जोखंड फेकूनी
बालचमू हा अत्यानंदला
भेटता सखे सोबती सारे
आनंद ओसंडून वाहला
पाठीवर ओझं दफ्तराचे
तरीही न शिण जाणवला
कैक दिवस सुट्टी मागूनी
दिवस शाळेचा उगवला
वाजली घंटा भरले वर्ग
बाक स्पर्शाने गहिवरला
पुस्तकं बाहेर डोकावता
दर्प वर्गावर्गात पसरला
सुरू झाले धडे शिकविणे
शब्द अंकांनी फळा भरला
वाटले जरी मोकळे आकाश
भय कोरोनाचा पाठीशी उरला
[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६