You are currently viewing स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत ७/१२ योजनेचा फोंड्यात शुभारंभ..!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत ७/१२ योजनेचा फोंड्यात शुभारंभ..!

फोंडाघाटा मध्ये शास्त्रीजी व गांधीजी जयंती आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोफत ७/१२ योजनेचा शुभारंभ

खेड्यांच्या समृद्धीसाठी “७/१२ घरोघरी” हा उपक्रम स्तुत्य : माजी सभापती सुजाता हळदीवे-राणे.

कणकवली :

खेडोपाडी चला” या महात्मा गांधींच्या विचाराप्रमाणे, खेड्यांच्या समृद्धी वर देशाचा विकास अवलंबून आहे. त्यामुळे खेड्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाने ” सात-बारा घरोघरी ” ही योजना आजपासून कार्यान्वित केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा सात-बारा मोफत घरपोच होणार आहे. ते प्रत्येकाने तपासून घ्यावेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या योजनेचा शुभारंभ प्रातिनिधिक स्वरूपात महात्मा गांधी व शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आला, हा सर्वांसाठी स्तुत्य उपक्रम आहे. असे उद्गार कणकवली माजी सभापती सुजाता हळदीवे- राणे यांनी काढले.

फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच संतोष आग्रे व मान्यवरांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, आदरांजली वाहिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासनाच्या, सात-बारा घरोघरी उपक्रमाचा शुभारंभ आज जयंतीचे औचित्य साधून होत आहे. यामध्ये काही त्रुटी असल्यास ऑफिसशी संपर्क साधावा ,असे आवाहन करून फोंडा तलाठी अरुणा जयानावर यांनी ई- पीक पाहणी ऍप , सर्व शेतकऱ्यांनी कार्यान्वयित करून माहिती भरावी, अशी आग्रही विनंती केली.

मान्यवरांचे हस्ते शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत सातबारा वितरित करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विश्‍वनाथ जाधव, दर्शना पेडणेकर, प्रीतम भोगले, शशिकला शितोळे, शेखर जाधव, विजय फोंडेकर आणि राजन चिके बबन हळदीवे ग्रामपंचायत व महसूल ऑफिस स्टाफ कोतवाल पांडू राणे, भूषण कदम इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविस्तार अधिकारी चौलकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा