ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे. आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा
कुडाळ नगरपंचायतीमध्ये समावेशन न झालेल्या ३५ कर्मचाऱ्यांचे नगरपंचायत मध्ये समावेशन करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यामागणी नुसार पहिल्या टप्प्यात ३५ पैकी ४ कर्मचार्यांचे समावेशन करण्यात आले आहे. उर्वरित कर्मचार्यांच्या समवेशनाची कार्यवाही सुरू असून यासाठी आमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये सचिन सुरेश म्हाडदळकर व राजाराम नारायण कुंभार यांना लिपिक पदासाठी , पुंडलिक सहदेव होडावडेकर यांना व्हाल्ममन पदासाठी तर संजय कृष्णा टेंबुलकर यांना शिपाई पदासाठी अशा या ४ कर्मचार्यांना कुडाळ नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधातील पदांवर सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कुडाळ नगरपंचायतची स्थापना होण्यापूर्वी कुडाळ ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात होती. या ग्रामपंचायतमध्ये सफाई कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी व इतर कार्यालयीन कार्मचारी असे मिळून ६० कर्मचारी कार्यरत होते. कुडाळ नगरपंचायतची स्थापना झाल्यानंतर यातील १४ कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात आले. तसेच ११ कर्मचारी निवृत्त व काही मयत झाले आहेत. तर उर्वरित ३५ कर्मचारी कार्यरत आहेत.परंतु या कर्मचाऱ्यांचे कुडाळ ग्रामपंचायत मधून कुडाळ नगरपंचायत मध्ये समावेशन झालेले नाही याबाबत आमदार वैभव नाईक यांनी कर्मचार्यांसमवेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कर्मचारी समावेशनाबाबत २ ऑगस्ट २०२१ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी तात्काळ यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबईचे सहायक आयुक्त कैलास गावडे यांनी कोकण विभागीय प्रादेशिक उप आयुक्त यांना परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या १६ सप्टेंबर २०२१ रोजी सूचना दिल्या. त्यानुसार २१ सप्टेंबर २०२१ रोजी ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कोकण विभाग नगरपरिषद प्रशासन विभागीय आयुकत विलास पाटील यांनी आदेश निर्गमित करत ३५ कर्मचार्यांपैकी ४ कर्मचार्यांना कुडाळ नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधातील पदांवर सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.