You are currently viewing महेंद्रा अकॅडमी तर्फे पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी ३ दिवस मोफत कार्यशाळा

महेंद्रा अकॅडमी तर्फे पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी ३ दिवस मोफत कार्यशाळा

तज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

सावंतवाडी

राज्यात नव्याने होणार्‍या पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर महेंद्रा अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून २५ ते २७ या कालावधीत सावंतवाडीत मोफत कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी तज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.

यात ग्राउंड व लेखी परिक्षेची तयारी करुन घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या ३ विद्यार्थ्यांना पोलिस भरती होई पर्यंत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घ्यावा, असे आवाहन अ‍ॅकेडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी केले आहे. राज्यात नव्याने १८ हजार पोलिसांची भरती लवकरच होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त विद्यार्थ्यानी या कार्यशाळेत भाग घ्यावा तसेच २५ तारखे पर्यंत नाव नोंदणी स्विकारली जाईल, असे पेडणेकर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी 9022686944 या नंबरवर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा