You are currently viewing रेडी व परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेंचे लोकार्पण…

रेडी व परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेंचे लोकार्पण…

वेंगुर्ले

तालुक्यातील रेडी व परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेंचे आज माजी आमदार शंकर कांबळी व शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य सचिन देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र शासन, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून ही रुग्णवाहिका प्राप्त झाली असून तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांनी यासाठी सतत पाठपुरावा केल्याने गेल्या कित्येक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे. आता रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे आहे.

रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यावेळी जि.प. सदस्य प्रितेश राऊळ, पंचायत समिती सदस्य मंगेश कामत, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नामदेव राणे, शिवसेना महिला आघाडी विभाग संघटक रश्मी डीचोलकर, विभाग प्रमुख काशिनाथ नार्वेकर, माजी उपसरपंच सायली पोखरणकर, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राऊल गावडे, डॉ.प्रसाद साळगावकर, डॉ. नवार, डॉ.सुखले, अनंत कांबळी, संतोष मांजरेकर, श्री. गवंडे, रवी पेडणेकर, बाळा रेडकर, सुनील सातजी, आप्पा साळगावकर, रफिक बेग, शेखर तुळसकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर परुळे येथील कार्यक्रमाला म्हापण उपतालुकाप्रमुख मनोहर येरम, विभागप्रमुख योगेश तेली, युवासेना विभागप्रमुख विजय घोलेकर, उपविभागप्रमुख वसंत साटम, युवासेनेचे रोहित म्हापणकर, चिपी सरपंच गणेश तारी, कोचरा सरपंच साची फणसेकर, भोगवे सरपंच रुपेश मुंडये, म्हापण सरपंच अभय ठाकूर, उपसरपंच अशोक पाटकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य अजित परुळेकर, भोगवे शाखाप्रमुख गुरुनाथ गायकवाड, केळुस माजी सरपंच योगेश शेट्ये, उमेश नेवाळकर, अनिल दाभोलकर, उदय दाभोलकर, कुशेवाडा शाखाप्रमुख उमाकांत परब, म्हापण शाखाप्रमुख प्रशांत ठाकूर, परुळे उपसरपंच सौ. नेवाळकर, परुळे सोसायटी व्हाईस चेअरमन शरद हडकर, प्राथमिक आरोग्य केंद्र परुळेचे डॉ कोळी, डॉ. चिंदरकर, सी. एस. म्हापणकर, आरोग्य सेविका श्रीमती मांजरेकर, राजाराम हडकर, कोचरा आरोग्य सेवक संभाजी आचरेकर, नेत्र चिकित्सक रामचंद्र तेली, आरोग्य सहाय्यक श्री गंगावणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 2 =