– जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख.
तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णवाहिकांची असलेली कमतरता निदर्शनास आणून दिली होती त्याच वेळेस त्यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी यांना तातडीने प्रस्ताव करण्यास सांगितले होते तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव पाठविल्यानंतर तातडीने कार्यवाही करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे काँग्रेस पक्षाचे आमदार असलेले महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता केली. परंतू सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र भाजप व शिवसेना श्रेयवादासाठी धडपडत आहे.
आज पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी अनेक विकास कामे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून झाली आहेत ती काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाली परंतू कामे करूनसुद्धा आज जिल्ह्यात ज्या प्रमाणे प्रसिद्धीसाठी जी किळसवाणी चढाओढ चालली आहे अशाप्रकारे काँग्रेस पक्षाने कधीही केले नाही आणि आजही या रुग्णवाहिकांच्या उद्यघाटनासाठी करत नाही असे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख यांनी सांगितले.