You are currently viewing सावंतवाडी शहरात पालिकेकडून पुन्हा एकदा “स्वच्छ सर्वेक्षण” मोहीम…

सावंतवाडी शहरात पालिकेकडून पुन्हा एकदा “स्वच्छ सर्वेक्षण” मोहीम…

कचऱ्याच्या वर्गीकरणाचे दाखविले प्रात्यक्षिक; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आडिवरेकरांचे आवाहन…

सावंतवाडी

येथील पालिकेच्या माध्यमातून शहरात पुन्हा एकदा “स्वच्छ सर्वेक्षण” मोहीम राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ आज संत गाडगेबाबा भाजी मंडईत करण्यात आला. यावेळी तेथील व्यापाऱ्यांना कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत मार्गदर्शन करत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तर याप्रसंगी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक तथा आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी केले आहे.
यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, आनंद नेवगी दिपाली भालेकर, दिपाली सावंत, राजू बेग, सुरेंद्र बांदेकर, रसिका नाडकर्णी, देविदास आडकर, विजय बांदेकर, पांडुरंग नाटेकर, निवेद कांबळी, संजीवनी शिरसाट आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
यावेळी सुका कचरा, ओला कचरा, धोकादायक कचरा व घरगुती घातक कचरा असे वर्गीकरण करून नागरिकांनी आपल्या घरातील कचरा घंटागाडी वर द्यावा जेणेकरून त्याचा त्रास सफाई कर्मचाऱ्यांना होणार नाही, असे आवाहन सौ नाडकर्णी यांनी केले. दरम्यान त्याचे वर्गीकरण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक व्यापाऱ्यांना दाखविण्यात आले. तर माझी व सुंदर अभियानांतर्गत उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली.
याप्रसंगी पालिकेचे सफाई कर्मचारी गणेश खोरागडे, जयवंत जाधव, मोहन कांबळे, बबन जाधव, युवराज मेहत्तर आदींचा यावेळी शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा