You are currently viewing १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरीकांचा स्नेहमेळावा

१ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरीकांचा स्नेहमेळावा

वेंगुर्ला

आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग आणि कर्मसिंधु प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व किरण ट्रेडिंग कंपनी, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत साई मंगल कार्यालय, वेंगुर्ल येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.पी.जोशी यांच्यासह निवडक शासकीय अधिकारी व निमंत्रित मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना, ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत महत्त्वाच्या तरतुदी, न्यायाधिकरण बाबतची अद्ययावत माहिती, कायदे व नियम/शासन निर्णय यांची सविस्तर माहिती तज्ज्ञ व्यक्तिमार्फत देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीची सेवा आणि माहितीसाठी शासकीय मोफत राष्ट्रीय हेल्पलाईन सुविधा-१४५६७ बाबतची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आधार फाऊंडेशनच्या अध्यक्षा माधुरी वेंगुर्लेकर व कर्मसिधु प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.वंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे. उपक्रमाबाबत अधिक माहिती करिता नंदन वेंगुर्लेकर (९४२२४३४३५६) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा