You are currently viewing सतार्डा उपकेंद्रासाठी सी एच ओ  मागणी शिवशंभु संघटनेचे निवेदन

सतार्डा उपकेंद्रासाठी सी एच ओ मागणी शिवशंभु संघटनेचे निवेदन

सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यासाठी आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करावी, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिवशंभू संघटनेच्या सिंधुदुर्ग शाखा, सावंतवाडी तालुक्याच्या वतीने मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष महादेव पवार, आरोग्य सहाय्यक शंकर परब, शिवशंभू संघटना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समीर सावंत, कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, सदस्य सुधा कवठणकर, संदेश कवठणकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा