You are currently viewing मुख्याधिकाऱ्यांच्या धास्तीने भोळा शिव घेतो मटका साईंच्या मंदिरात

मुख्याधिकाऱ्यांच्या धास्तीने भोळा शिव घेतो मटका साईंच्या मंदिरात

*मटक्याच्या टपरीवर धाड पडण्याचा घेतला धसका.*

सावंतवाडीत मटक्याच्या कंपन्या आणि मटका किंग बरेच झालेत, प्रत्येकाची एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा असते. यातच सत्तेत असलेल्या *सत्ताधाऱ्यांचा आपला माणूस* असेल तर त्याची चांदीच असते. सत्तेच्या जोरावर मोक्याची ठिकाणी एखादी टपरी टाकून अगदी पडीक असल्यासारखा मटक्याच्या व्यवसाय करता येतो, जुन्या पुरण्या टपरीवर सहजा मटका खेळणाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणाचा लक्ष जात नाही त्यामुळे मटक्याचा धंदा जोरदार होतो.
सावंतवाडीत भर बाजारपेठेत एका वर्दळीच्या तिठ्यावर साईमंदिराच्या समोरच सत्ताधाऱ्यांशी संबंधित व्यक्तीने मटक्याची टपरी सुरू केली. अनेकांना परिचित असलेल्या या मटकेवाल्याकडे जोरदार मटक्याचा व्यवसाय होऊ लागला. बेकायदेशीर, अवैध म्हणून गणला जाणाऱ्या मटक्याच्या टपरी वजा दुकानांवर सावंतवाडीचे नगरपालिका मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी धाडसत्र सुरू केले. त्यामुळे अनेक मटकेवाल्यानी त्यांचा धसका घेतला. परंतु साई मंदिर समोर मटका घेणाऱ्या भोळ्या सांब शंकराचे नाव धारण करणाऱ्याने सत्ताधारी असल्याने बिनधास्तपणे मटका सुरू ठेवला होता. मात्र मुख्याधिकारी जावडेकर यांनी धाड टाकून त्याला जोरदार दणका देत १००००/- चा दंड केला.
मुख्याधिकारी धाड टाकून दंड करत असल्याने त्यांच्या धाडसत्राचा धसका घेतलेल्या भोळ्या सांब शंकराने टपरीवर मटका घेतल्यास धाड पडली तर? या भीतीनेच गिर्हाईक फिरकत नसल्याने बाजूच्या साई मंदिरात मटका घेण्यास सुरुवात केली. स्टॉलवर न बसल्याने पूर्वीसारखे कलेक्शन होत नाही, त्यामुळे भोळा सांब शिव चिंतेत पडला आहे.
मंदिरात बसून मटक्याचा अपेक्षित धंदा होत नसल्याने भोळा शिव कंटाळला आणि मोबाईल वर आकडे घ्यायचे तरी पंचाईत होते. मोबाईल वर आकडा लावणारा पैसे देईलच याची खात्री नसते आणि अनेकांनी या भोळ्या शिव ला टोपी घातली आहे. त्यामुळे एकवेळ मटक्याच्या जीवावर उड्या मारणाऱ्या भोळ्या शिव ला मुख्याधिकारी कधी बदलतात याचीच वाट पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा