You are currently viewing मटका टपरीवर धाड टाकून मुख्याधिकारी करतात दहा हजारांची वेगळीच पावती.

मटका टपरीवर धाड टाकून मुख्याधिकारी करतात दहा हजारांची वेगळीच पावती.

सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी सावंतवाडीतील मटका सारख्या अवैध व्यवसायाला चाप लावला आहे. सावंतवाडीतील बाजारपेठेत अचानक टपरीवर धाड टाकून मटका स्वीकारणाऱ्या टपरीवर धाड टाकून त्यांना दंड करतात. पुन्हा मटका स्वीकारताना आढळल्यास टपरी सील करण्याचा इशारा देखील देतात. दबंगगिरी करणारे सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जावडेकर मटका स्वीकारणाऱ्या टपरी मालकाला दहा हजार रुपयांचा दंड करतात, परंतु दंडाची पावती देताना मात्र दुकानात बंदी असलेले प्लास्टिक सापडल्याची पावती देतात.
बेकायदेशीररित्या अवैध धंदे करणारे टपरी चालक मटका स्वीकारताना पकडले जातात परंतु मुख्याधिकारी त्यांच्यावर मटका स्वीकारत असूनही प्लास्टिक सापडल्याची पावती देऊन मटक्यासारख्या अवैध धंद्यावर पांघरून तर घालत नाहीत ना? असा प्रश्न उभा राहत आहे. एकीकडे खाकीच्या आशिर्वादावर जिल्ह्यात गैरधंदे बोकाळले आहेत, हफ्तेखोरीमध्ये गैरधंद्याना रान मोकळे झाले आहे, मिडियामधून वारंवार याबाबत आवाज उठत आहेत, परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार आणि पोलीस प्रशासन देखील डोळे झाकून निद्रिस्त आहेत. अशावेळी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जावडेकर मटका व्यवसायाविरुद्ध मोहीम राबवित आहेत परंतु मटका स्वीकारताना पकडले जाऊनही पावती मात्र बेकायदेशीररीत्या प्लास्टिक बाळगल्याची पावती करून मटका व्यवसायाला एकप्रकारे झाकून ठेवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा टपरीवर मटका व्यवसाय केला तरी कायदेशीररित्या स्वतः मुख्याधिकारी काही कारवाई करू शकतील का?

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − four =