You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या गणेशाचे दर्शन घेऊन केली आरती

पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवली तालुका रिक्षा संघटनेच्या गणेशाचे दर्शन घेऊन केली आरती

राज्यावरील संकटांची मालिका थांबण्यासाठी घातले साकडे

सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कणकवली रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी श्री.सामंत यांनी श्रीगणेशाची आरती देखील केली.
“राज्यावर सुरू असलेली संकटांची मालिका आता थांबू दे,” असे साकडे कणकवली रिक्षाचालकांच्या राजासमोर नामदार उदय सामंत यांनी घातले. यावेळी संदेश पारकर यांनी रिक्षा चालक मालकांना व्यवसाय करताना येणाऱ्या विविध मागण्या व समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.
“रिक्षा संघटनेच्या पाठीशी शिवसेना आपण भक्कमपणे उभी असुन लवकरच संघटनेच्या सदस्यांना वेळ देऊन त्यांच्या समस्या जाणुन घेऊन मार्गी लावणार,” अशी ग्वाही श्री.सामंत यांनी दिली. यावेळी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने पालकमंत्री महोदयांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक कन्हैया पारकर, सुशांत नाईक, अँड.हर्षद गावडे, प्रसाद अंधारी, निसार शेख, कलमठ उपसरपंच वैद्यही गुडेकर, विलास गुडेकर, रिमेश चव्हाण, कणकवली रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, भाई परब, अरुण परब, प्रभाकर कोरगावकर, संतोष सावंत, मनोज वारे, रमाकांत आरोलकर, संदीप घाडी, श्री.मोर्ये आदिंसह रिक्षा चालक-मालक संघटनेचे सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =