You are currently viewing खांबाळे हेदीचा टेंब येथील धनगरवाडीला छत्रपती राजे यशवंतराव होळकर यांचे नावावरून (यशवंतवाडी) असे नाव देण्यात यावे ; ऑल इंडिया धनगर समाज महासंघ वैभववाडी तालुका यांच्यावतीने करण्यात आली मागणी

खांबाळे हेदीचा टेंब येथील धनगरवाडीला छत्रपती राजे यशवंतराव होळकर यांचे नावावरून (यशवंतवाडी) असे नाव देण्यात यावे ; ऑल इंडिया धनगर समाज महासंघ वैभववाडी तालुका यांच्यावतीने करण्यात आली मागणी

सदर मागणीचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज विजयसिंह काळे यांनी केले स्वागत, या मागणीचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक

वैभववाडी

खांबाळे हेदीचा टेंब येथील धनगरवाडीला क्षत्रिय धनगरपुत्र चक्रवर्ती छत्रपती राजे यशवंतराव होळकर यांचे नावावरून *यशवंतवाडी* असे नाव देण्यात यावे या करिता गावच्या सरपंच सौ.गौरी गणेश पवार यांच्याकडे ऑल इंडिया धनगर समाज महासंघ वैभववाडी तालुका पदाधिकारी यांच्याकडून मागणी करण्यात आली. शासनाच्या धोरणानुसार जातीच्या नावाने असलेल्या वाडीचे नाव *यशवंतवाडी* असे करण्याबाबत *यशवंतवाडी नियोजित* असे बॅनरचे अनावरण करून नामकरण करण्याबाबत विनंती केली.अध्यक्षीय भाषणात सरपंच सौ.पवार यांनी याबाबत ठराव ग्रामपंचायतमध्ये मंजूर करून संबंधित नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल असे आश्वासन दिले.दरम्यान नमूद बॅनरचे अनावरण खांबाळे गावच्या विद्यमान सरपंच सौ.गौरी पवार, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऑल इंडिया धनगर समाज तालुका अध्यक्ष श्री.दाजी बर्गे, श्री.गणेश पवार,श्री.बाबाजी देसाई,श्री.रमेश बरगे,श्री.संजय गुरखे,ज्येष्ठ समाज बांधव श्री.बाबू चिंचू बोडेकर,श्री.बयाजी चिंचू बोडेकर,माजी सैनिक श्री. भोरू बोडेकर,श्री.अंबाजी बोडेकर,ग्रामस्थ श्री.संतोष अडूळकर,श्री.भरत अडूळकर,
भागोजी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्री.प्रकाश देसाई, व सचिव श्री.अनंत देसाई,श्री.गंगाराम बोडेकर,श्री.सुभाष बोडेकर,श्री.विनोद बोडेकर,श्री.गणपत बोडेकर,श्री.जनार्दन बोडेकर, सौ.सायली जनार्दन बोडेकर, सौ.सविता बबन बरगे,
श्री.प्रकाश बजू बरगे.यांच्यासह विद्यार्थी कुमार वैभव बोडेकर,वेदांत बोडेकर,
कुमारी वल्लिका बोडेकर,हिताक्षी बोडेकर, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
*यशवंतवाडी* नाव देण्याबाबत केलेल्या मागणीचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज विजयसिंह काळे यांनी स्वागत केले असून या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा