You are currently viewing भारत बंदला मालवण तालुका कॉंग्रेस कमिटीचा पाठिंबा

भारत बंदला मालवण तालुका कॉंग्रेस कमिटीचा पाठिंबा

केंद्र सरकारचा केला निषेध

मालवण

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार आज दिनांक २७ सप्टेंबर २०२१ राेजी देशातील शेतकऱ्यांनी माेदी सरकारच्या विरोधात जे भारत बंद आंदोलन पुकारलेले आहे व कामगार विरोधी धाेरण केले आहे आणि माेदींनी लाेकांना खाेटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी आज दुपारी ठीक १२:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बांगीवाडा येथे मालवण कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व फ्रंटल विभागाचे पदाधिकारी व विधान सभेचे, लाेकसभेचे उमेदवारांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
यावेळी मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी, सरचिटणीस महेंद्र मांजरेकर, सेवादल अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मेघशाम लुडबे, दिलीप तळगावकर, दिलीप तळगावकर, दिलीप मसुरकर, हरी खवणेकर, हेमेंद्र तळवडेकर, संजय धुरी, शेखर डिचोलकर, मधुकर लुडबे, हेमंत कांदळकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा