बांदा
जिल्हा परिषद बांदा नं १ केंद्रशाळेत लाॉकडाऊन कालावधीत राबविण्यात आलेले वैशिष्टपूर्ण उपक्रम व यावर्षी आलेल्या अभूतपूर्व महापुरामुळे शाळेच्या शाळेच्या भौतिक गरजा पूर्ततेसाठी दोन वर्गखोल्यांचे सिलींग करणेकरीता रोटरी क्लब मुंबई माहिम यांचेकडून ६५हजार रुपयांचा आर्थिक मदतनिधी शाळेसाठी प्राप्त झाला.
या कामकाकजाची सुरवात मान्यवरांच्या उपस्थित नुकतीच सुरवात करण्यात आली तंटामुक्त अध्यक्ष गरुनाथ सावंत शुभहस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, मुख्याध्यापिका सरोज नाईक, गजाजन सावंत मोर्ये, श्रद्धा नार्वेकर, प्रवीण गाड, माधवी गाड, ठेकेदार अनिश शहा, वंदना शितोळे, श्रीमती जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
गेल्या दिड वर्षात बांदा केंद्रशाळेत लाॅकडाऊन कालावधीत चार लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव लोकसहभागातून करण्यात आला आहे.रोटरी क्लब माहिम यांनी शाळेसाठी दिलेल्या या योगदानाबद्दल उपस्थित मान्यरांच्या वतीने आभार मानण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.डी.पाटील यांनी केले तर आभार उपशिक्षक रंगनाथ परब यांनी मानले.