कासार्डे हाय-मध्ये ‘ई पिक पाहणी ॲप’ संदर्भात मार्गदर्शन
तळेरे :-प्रतिनिधी
“ई पिक पाहणी अॅपच्या” प्रचार- प्रसारासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन महसूल विभाग तळेरे मंडलाचे नूतन मंडल अधिकारी संतोष नागावकर यांनी कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना बहू उपयोगी ठरणारे ‘ई पिक पाहणी अॅप केले असून, जिल्हा अधिकारी के मंजूलक्ष्मी, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तालुका तहसीलदार आर.जे.पवार यांच्या मार्गदर्शनानुसार कासार्डे हायस्कूलच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना “ई पिक पाहणी अॅप” संदर्भात मंडल अधिकारी संतोष नागावकर मार्गदर्शन करताना बोलत होते.
याप्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक नारायण कुचेकर,कासार्डे गावचे तलाठी किरण गावडे,कोतवाल दिपक आरेकर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
दरम्यान शेतकऱ्यांना वरदान ठरणार असलेल्या’ ई पिक पाहणी अॅप’ ची नागावकर यांनी सविस्तर माहिती दिली.
ज्या शेतकरी वर्गाला अॅप संदर्भात अडचणी येतात त्यांना वाडीवार विखुरलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अॅप डाऊनलोड व रजिस्ट्रेशन करण्याकरीता शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शासनाला सहकार्य करावे आवाहन तलाठी किरण गावडे यांनीही केले.
मान्यवरांचे स्वागत पर्यवेक्षक नारायण कुचेकर यांनी करीत या अॅप संदर्भात प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांचे महसूल विभाग व कृषी विभागाला निश्चितच संपूर्ण सहकार्य करण्यात येईल ग्वाही दिली.मंडल अधिकारी संतोष नागावकर यांनी तळेरे,वारगाव, खारेपाटण या हायस्कूल मध्ये शिक्षकांना या अॅप संदर्भात मार्गदर्शन केले.
कासार्डे माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना ई पिक पाहणी अॅप संदर्भात मार्गदर्शन करताना मंडल अधिकारी संतोष नागावकर सोबत नारायण कुचेकर व किरण गावडे …
छाया: दत्तात्रय मारकड