You are currently viewing जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य दीपक पटेकर यांची अभंग रचना

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य दीपक पटेकर यांची अभंग रचना

*कर्मगती*

चिंतता सुख ते ! मिळे समाधान !!
राखावे इमान ! स्वतःशीच !!१!!

विचारही बुरे ! नसावेत मनी !!
विचारांनी हानी ! आपुलीच !!२!!

हित चिंतोनिया ! पहा एकदाची !!
अनुभूती त्याची ! सुख देई !!३!!

मनाचिया शांती ! मन हेच देई !!
मनस्ताप होई ! कर्मगती !!४!!

असेल जे कर्म ! इथेच करावे !!
इथेच भरावे ! याची जन्मा !!५!!

फेडण्या ती पापे ! कोणी दुजा दिला !!
जन्म माणसाला ! मानवाचा !!६!!

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 7 =