*पित्रूपक्ष…..*
गेले सोडून पूर्वज त्यांची करा आठवण
त्यांच्यामुळे मिळे जन्म हेच त्यांचे मोठे ऋण
संस्कारांची देती पुंजी नाव ठेवूनिया जाती
त्यांचे स्मरण करणे हेची राही फक्त हाती….
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
किती पिढ्यांचे ऋण हो किती पिढ्यांचे संस्कार
पूर्वजांचे आम्हावर फारफार उपकार
देती गुणांचा वारसा जणू घडविती घडा
माती थोपटून पहा जणू उचलती विडा…
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
आजी आजोबा पितरे किती असती मायाळू
गुण आठवता त्यांचे अजूनही येते रडू
नाही फिटणार ऋण एक दिवस दिल्याने
घास गोडाधोडाचा हो धाब्यावर ठेवल्याने ….
ंंंंंंंंंंंंंंंंंंं
ते असतात जेव्हा प्रेम आदराने वागा
माया अतूट असते जणू रेशमाचा धागा
जीवापाड करतात प्रेम नातवंडां वरती
साय दुधावरची ते जपतात किती किती ….
ंंंंंंंंंंंंंंंंंंंं
जे जे पेराल आपण तेच तेच उगवते
दृढ ठेवा घरातील साऱ्यांशीच प्रेम नाते
यावा आपला आठव असे असावे वर्तन
नाही केले मग तरी पहा चालते कीर्तन ….
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
त्यांच्या चिंतना साठीच पितृपक्ष पंधरवाडा
गुण आठवा त्यांचे नि थोडी सवड ही काढा
मागच्यांना कळावे की कोण होते हो पूर्वज
किती हुशार नि थोर जणू होते ते सर्वज्ञ….
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंं
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)