You are currently viewing वैभव नाईक… रस्त्याची नव्हे, खड्डयांची जबाबदारी घ्या!!

वैभव नाईक… रस्त्याची नव्हे, खड्डयांची जबाबदारी घ्या!!

भाजपा कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे यांची संतप्त प्रतिक्रिया

कुडाळ मालवणमधील रस्त्याची जबाबदारी माझी म्हणत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भोळेपणाचा आव आणू नये. रस्त्यापासून सर्वच कामात चाललेल्या भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा दाखवायची हिंमत ते करणार आहेत का? असा खणखणीत सवाल भाजपाचे कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे यांनी केला आहे.

रस्त्याची नव्हे तर खड्ड्यांची जबाबदारी आमदार वैभव नाईक यांनी घ्यावी. सत्ता असूनही सर्वात धोकादायक रस्ते बनवण्यामागची गणिते जनतेला समजत नाहीत असे त्यांना वाटत असेल. पण ठेकेदारी पोसण्यासाठी जनतेला खड्ड्यात घालून शारीरिक पीडा आणि आर्थिक हानी दिली आहे. रस्त्यांची जबाबदारी माझी म्हणणे हा शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा प्रामाणिकपणा असल्याची मखलाशी त्यांचे नाकावर पडलेले समर्थक करत असले तरी तो प्रामाणिकपणा नसून शिवसेना सरकारचे कोकणवरील दुर्लक्ष, सत्तेचा फोलपणा आणि आमदार वैभव नाईक यांच्या अपयशी निर्लज्जपणाची कबुली आहे. जनतेची कोरडी दिलगिरी मानण्याचा तोंडदेखलेपणा करण्यापेक्षा आमदार वैभव नाईक यांनी राजीनामा देऊन प्रायश्चित्त घ्यावे, असे विनायक राणे यांनी म्हंटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा