मनसेचे मालवण नगरपरिषदेला सात दिवसांचे अल्टीमेटम..!!
मालवण शहरात अनेक परप्रांतीय व्यवसाय करत आहेत त्यात अशे अनेक फेरीवाले आहेत ज्यांची इथे नोंद देखील नाही किंवा त्यांना नगरपरिषदे कडून कोणताही अधिकृत परवाना दिलेला नाही केवळ आपले कोणीतरी नातेवाईक येथे वास्तव्यास आहेत ह्या कारणास्थव त्यांनी आपला हातगाडी वरती व्यवसाय चालू केला आहे त्यात गेल्या पाच ते सहा महिन्यात अश्या अनधिकृत फेरीवाल्यानमध्ये वाढ झालेली दिसत आहे
मालवण शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढणारा हा फेरीवाल्यांचा वावर वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहे त्यात त्याचा नाहक त्रास हा नागरिकांना सहन करावा लागत आहे.मुख्यतः विजया बेकरी ते भंडारी हायस्कुल येथे अनधिकृत फेरीवाले खूप झाले आहेत त्यामुळे येथे नेहमी वाहतूक कोंडी होते.ऐन गणपतीत देखील हीच परिस्थिती होती यासंदर्भात बहुतेक नागरिकांच्या तक्रारी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडे आल्या आहेत ,ह्या आधी देखील परप्रांतीयांकडून मालवण आणि तारकर्ली देवबाग मध्ये विकृत घटना देखील झाल्या आहेत त्यात हा परप्रांतीयांचा वाढणारा वावर हा अधिकचा भार व डोकेदुखी प्रशासनावर पडत आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून वारंवार ह्या अनधिकृत परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्यासाठी प्रशासनास निवेदन वजा विनंती केली गेली आहे ,तरी ह्या वेळी निदान ह्या गोष्टी मध्ये लक्ष घालून विजया बेकरी ते भंडारी हायस्कुल ह्या व मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना येत्या आठवड्याभरात उठवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी हि विनंती अन्यथा आठ्वड्याभरा नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून मनसे स्टाइल ह्या अनधिकृत परप्रांतीय फेरीवल्यानां हटवण्यात येईल या आशयाचे निवेदन मालवण नगरपरिषद व प्रत मालवण पोलीस स्टेशन येथे देण्यात आली ह्या वेळी मनविसे मालवण शहरअध्यक्ष साईराज चव्हाण,मनविसे सर्जेकोट विभाग अध्यक्ष जनार्दन आजगांवकर,मनविसे तारकर्ली प्रतिक कुबल,मिलिंद तेली,मनसे सर्जेकोट शाखाध्यक्ष वैभव आजगावकर, मनसे तारकर्ली शाखाध्यक्ष प्रसाद बापर्डेकर आदी उपस्थित होते