You are currently viewing भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण!

भाजप नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण!

मुंबई :

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अनेक नेतेमंडळीना देखील कोरोनाची लागण झाल्याचं दिसलं आहे. यातच आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.
राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः फेसबूकच्या माध्यमातून ही माहिती काल दिली आहे.
फेसबूक पोस्टमध्ये सुधीर मुनगंटीवर म्हणतात, ‘माझी कोव्हिड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉल चे पालन करून स्वतःची चाचणी करून घ्यावी ही विनंती.

प्रतिक्रिया व्यक्त करा