You are currently viewing बँक कर्मचारी आत्महत्येतील नक्की गुढ काय?

बँक कर्मचारी आत्महत्येतील नक्की गुढ काय?

चार दिवसानंतरही का लागत नाही शोध?

ओटवणे नदीच्या बाजूला आपली ह्युंदाई कार लावून गाडीत “आपणआत्महत्या करत असल्याची” चिठ्ठी लिहून ठेवत गायब झालेल्या बँक कर्मचारी मनोहर प्रभाकर गावडे यांचा चार दिवस उलटूनही तेरेखोल नदी पात्रात आणि आजूबाजूच्या जंगल परिसरात शोध लागू शकला नाही. त्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवणाऱ्या बँक कर्मचारी मनोहर गावडे यांनी नक्कीच आत्महत्या केली की हा आत्महत्येचा स्टंट? असा प्रश्न यापूर्वीच संवाद मीडियाने उपस्थित केला होता. गेले चार दिवस नदीपात्रात ४ किमी पर्यंत शोध घेतला तसेच नदी किनाऱ्यांवर शोध घेऊनही कोणताही सुगावा हाती लागला नाही. सदर व्यक्तीने नदीपात्रात आत्महत्या केली असती तर नक्कीच मृतदेह कुठेतरी किनाऱ्यावर लागला असता, किंवा जंगलात सापडून आला असता. परंतु एवढा प्रयत्न करूनही त्या व्यक्तीचा पाण्यात, जंगलात शोध न लागल्याने बँक कर्मचाऱ्याने आत्महत्या केली नसून ती व्यक्ती जिवंत असल्याचा संशय बळावला आहे.
चार दिवसानंतर सावंतवाडी पोलिसांनी आत्महत्येची चिठ्ठी लिहून बेपत्ता असलेल्या व्यक्तीची मिसिंग असल्याबाबत पोश्टर लावून, सदरची व्यक्ती आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी पोश्टर लावून आवाहन केल्यामुळे गायब असलेली व्यक्ती मृत झाली नसून जिवंत असल्याचा पोलिसांचा संशय बळावला आहे. परंतु पोलिसांकडून याबाबत दुजोरा मिळाला नाही. सदरचा बँक कर्मचारी जिवंत असल्याचे गृहीत धरून पोलिसांनी त्यादृष्टीने तपासला सुरुवात केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा