राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे नियोजन
राज्य शासनाच्या ई पीक पाहणी या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये मोबाईल अॅपदवारे पिकांची प्रत्यक्ष नोंदणी व पिकांची माहिती छायाचित्रांसह शेतकऱ्यांनी अपलोड करावीत .या संदर्भातील माहिती देण्यासाठी फोंडा घाट नवी कुरली वसाहत येथे अनंत पीळणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष यांच्या निवासस्थानी तहसीलदार आर.जे.पवार यांनी मार्गदर्शन केले.या वेळी परिसरातील शेतकरी हजर होते.या वेळी मंडळ अधिकारी प्रभू देसाई ,लोरे गाव तलाठी जंगले मॅडम, फोंडा गाव तलाठी कांबळे मॅडम उपस्थित होते.
यावेळी रघुनाथ कुलकर्णी, सकाराम हुंबे, स्नेहा सावंत, सुनीता राणे, प्रवीण पार्टे, देवेंद्र पिळणकर, तुषार पिळणकर, जयेश चव्हाण, दाजी येंदे बाबू सावंत, सचिन सावंत, तुषार गुरव, राजू गोसावी, प्रशांत बोबाते, विठोबा नारकर, गणेश निकम, कु.पूजा येंडे, कु तनय सावंत, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.