तुम्ही घरातील काही खर्चांचं पेमेंट बँकेत ऑटो डेबिट मोडवर टाकलं असेल, तर आता तुमच्या परवनगीविना बँक खात्यातून पैसे कट होणार नाही. भारतीय रिझर्व बँकेच्या (RBI)आदेशानुसार, आता बँकाना कुठलंही ऑटो डेबिट पेमेंट करण्यापूर्वी त्या खातेदाराची परवानगी घ्यावी लागणार आहे. 1 ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे. या बदलामुळे कुठल्याही डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर वा कुठलाही ईएमआय तुमच्या खात्यातून थेट कापला जाणार नाही, तो ईएमआय कापण्याआधी संबंधित बँकेला ग्राहकाची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
ऑटो डेबिट म्हणजेच तुमच्या मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे वीज, गॅस, एलआयसीचा हप्ता वा इतर ईएमआय जे तुम्ही दर महिन्याला भरता, ते बऱ्याचता तुम्ही ऑटो मोडवर टाकता. म्हणजेच, ते बिल आलं की बँक खात्यातून त्याची रक्कम आपोआप कापली जाते. यामुळे दरवेळी बिल भरण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागत नही. मात्र यात धोका असाही असतो, की बऱ्याचदा काही बिलं जास्त येतात, जास्त रक्कम जोडलेली असते, न घेतलेल्या सुविधेचे पैसे लावलेले असतात, अशावेळी ऑटो डेबिट मोड तोट्याचा ठरतो.
मोबईल बिल, ब्रॉडबँड बिल, वीजबिल, इन्श्युरंस प्रीमियम यावर याचा परिणाम होईल. जर हे बिल 5 हजारांच्या खाली असतील तर ते ट्रान्झक्शन कॅन्सल केले जातील, 5 हजारांच्या वरील बिल असेल तर तुम्हाला ती रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करावी लागेल. यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्डचा वापर करु शकता.
बँकांनी आता आपल्या ग्राहकांना याबाबत सूचना देण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक एक्सिसनेही आपल्या ग्राहकांना ऑटो डेबिट नियमांबद्दल सूचना देणं सुरु केलं आहे. बँकेने म्हटलं आहे की, RBI रिकरिंड पेमेंट गाईडलाईननुसार, 20 सप्टेंबर 2021 नंतरच्या रेकरिंग ट्राजक्शनसाठी एक्सिस बँक कार्डवर स्टँडिंग नियमांचं पालन केलं जाणार नाही. सेवा सुरु ठेवण्यासाठी तुम्ही थेट तुमच्या मर्चंटला कार्ड स्वाईप करुन पेमेंट करा.
नवीन नियमानुसार, बँक पेमेंट डिडक्शन होण्याच्या 5 दिवस आधी ग्राहकांना एक नोटिफिकेशन पाठवलं जाईल आणि ग्राहकांना त्याला मान्यता द्यावी लागेल. ग्राहकांची मान्यता मिळाल्यानंतर ऑटो डेबिट पेमेंट होऊ शकेल. 5 हजारांहून जास्तिच्या पेमेंटसाठी बँक ग्राहकांना एक वन टाईम पासवर्ड पाठवले, त्याद्वारे ऑटो पेमेंट करता येईल.